Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

कश्मीर हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्पर मदत; शेकडो पर्यटकांना सुखरूप परत आणलं

 


कश्मीर हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्पर मदत; शेकडो पर्यटकांना सुखरूप परत आणलं

 

पहलगाम, जम्मू-कश्मीर येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तातडीने मदतकार्यासाठी टीम पाठवली.

शिवसेनेचे पदाधिकारी अभिजीत दरेकर यांनी श्रीनगरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि महाराष्ट्रातील पर्यटकांशी थेट संपर्क साधून त्यांना धीर दिला. डोंबिवलीतील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती अत्यंत वेदनादायक होती. शेकडो पर्यटक अडकले होते, अनेकांचे प्रवासाचे बेत रद्द झाले होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे साहेब स्वतः श्रीनगरला पोहोचले. त्यांच्या उपस्थितीने पर्यटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. शेकडो पर्यटकांसाठी परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आणि ते सुखरूप महाराष्ट्रात परतले.

कश्मीरमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे उद्गार, “शिंदे साहेब के बारे में बहुत सुना था, लेकिन आज पता चला शिंदे साहब क्या चीज है”, हे शिंदे साहेबांच्या कार्यशैलीचे प्रतिक ठरले.

“हम डरेंगे नही और हम हटेंगे भी नही…” हे ब्रीद घेऊन कार्य करणाऱ्या शिवसैनिकांची ही मदत महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

 

Related posts

*सिडको घरांच्या किमतीत १० टक्के कपात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत मोठी घोषणा*

jantechasavdhanmaharashtra

आशाताई बुचके यांचा भाजप प्रवेश,आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला, भाजपाला विस्ताराची संधी:-..देवेंद्र फडणवीस

jantechasavdhanmaharashtra

*पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व : वसंतराव मुंडे*

Leave a Comment