Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील पहिला “ग्लास स्कायवॉक” प्रकल्प लोणावळ्यात साकार होणार….

प्रतिनिधी अमोल होजगे

महाराष्ट्रातील पहिला “ग्लास स्कायवॉक” प्रकल्प लोणावळ्यात साकार होणार….

लोणावळ्यातील नवीन प्रकल्प “ग्लास स्कायवॉक” भविष्यात दरीवरून चालण्याचा अन् हवेतून झेपावण्याचा आनंद पर्यटकांना घेता येणार.
राज्य सरकारने लोणावळा पर्यटनस्थळी ग्लास स्काय उभारण्याला तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळं भविष्यात लोणावळ्यातील टायगर आणि लायन्स पॉइंटचं रुपडं अक्षरशः पालटून जाणार आहे.
पुण्यातील थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या लोणावळ्यात निसर्गाचा आनंद घेतानाच तुम्हाला थरार अनुभवायला मिळणार आहे. दोन हजार फूट दरीवरून चालण्याचा आणि हवेतून झेपावण्याचा आनंद ही लवकरच घेता येणार आहे. राज्य सरकारने या पर्यटन स्थळी ग्लास स्काय उभारण्याला तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळं भविष्यात लोणावळ्यातील टायगर आणि लायन्स पॉइंटचं रुपडं अक्षरशः पालटून जाणार आहे. दोन हजार फूट खोल दरीवर स्काय वॉक उभारून हे दोन्ही पॉईंट एकमेकांना जोडले जाणार आहेत. यानिमित्ताने दरीवरून चालण्याचा अन झिप लाईनद्वारे हवेतून झेपावण्याचा थरार पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके ह्यांच्या दुरदृष्टीतून साकारण्यात येणारा हा प्रकल्प त्यांनी घेतलेल्या पाठपुराव्यातून होणार आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांनी ह्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे.
टायगर व लायन्स पॉईंट विकसित करण्यासाठीच्या विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता आज मिळाली.या प्रकल्पासाठी ३३३ कोटी ५६ लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे.
आपल्या मावळ तालुक्याला निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले आहे.हा अनमोल ठेवा पर्यटकांच्या आकर्षणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे.या परिसरात येणाऱ्या पर्यटकांकरिता एक नवं कुतूहल “ग्लास स्कायवॉक” प्रकल्पाच्या निमित्ताने निर्माण होणार आहे.पर्यटन विकास आणि निसर्ग पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी हा प्रकल्प मार्गदर्शक ठरेल.त्यामुळे या परिसरात पर्यटकांची वाढ होऊन मावळ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रावर आधारित स्थानिकांचे उद्योग-व्यवसाय आणि रोजगारात वाढ होईल.
सुमारे ४.८४ हेक्टर परिसरात होणाऱ्या प्रकल्पात परिसर विकासासह,१२५ मीटर लांब व ६ मीटर रुंद असा ग्लास स्कायवॉक, झिप लाईन, बंजी जम्पिंग, वॉल क्लायबिंग सारखे साहसी खेळ, १००० व्यक्तींसाठीचे ॲम्फी थिएटर, रस्ता रुंदीकरण,फुड पार्क व वाहनतळ तसेच पर्यटकांसाठीच्या आवश्यक सुविधांचा समावेश असणार आहे. पुढील तीन महिन्यांत प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार असुन पुढील दोन ते अडीच वर्षात काम पूर्ण होऊ शकते.

Related posts

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शिर्डी येथे पदाधिकारी अधिवेशन संपन्न

jantechasavdhanmaharashtra

रबाळे पोलीस ठाण्याची मोठी कामगिरी – चैन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघड; २.४० लाख किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

तुर्भे पोलिसांकडून सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवला

Leave a Comment