Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजशहर

*गणेश उत्सवा अगोदरच रस्त्यांची व्हावी डागडुजी! मा.नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांनी सहाय्यक आयुक्त यांना दिले निवेदन*

गणेश उत्सवा अगोदरच रस्त्यांची व्हावी डागडुजी! मा.नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांनी सहाय्यक आयुक्त यांना दिले निवेदन

कोपरखैरणे प्रतिनिधी

कोपरखैरणे विभागातील अनेक गणेश उत्सव मंडळ व सामाजिक कार्यकर्ते यांनी काही दिवसांवर गणेश उत्सव चालू होत असल्या कारणामुळे गणेशाचे आगमन सुरू झाले आहे पण खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत आगमना दरम्यान अनेक अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे हे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांना निवेदन दिले व लवकरात लवकर आपण या गोष्टीची दखल घेऊन प्रशासनाला कळवावे अशी मागणी केली व रवींद्र म्हात्रे यांनी *आपला प्रभाग/आपली जबाबदारी* या अनुषंगाने
कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 47, मधील सेक्टर- 5,6,7 व 8 येथील विभागात भरपूर प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे सामान्य नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रास होत असून वाहन चालकांनाही याचा बराच मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.येत्या 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सव सन सुरू होत असून *गणपती बाप्पाचे आगमन* सुद्धा सुरू झालेले आहे. त्या अनुषंगाने रस्त्यामधील पडलेले खड्डे संदर्भात कोपरखैरणे विभागातील सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी सुनील काठोळे व उपअभियंता शिकतोळे यांना निवेदन दिले व लवकरात लवकर या रस्त्याची डागडोजी व्हावी व नागरिकांना या उत्सवाचा आनंद व्यवस्थित रीतीने घेता येऊन वाहतूकदारांच्या ही समस्या सुटतील अशी प्रतिक्रिया निवेदन देताना मा. नगरसेवक रविंद्र बाबाजी म्हात्रे यांनी सांगितले यावेळी उपस्थित स्थानिक नागरिक शंकर जाधव, सुरेश टेकवडे, भिकाजी जाधव

Related posts

*नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३, पनवेल यांनी हरवलेले २५ लाख रुपये किंमतीचे १२२ मोबाईल फोन नागरिकांना परत*

jantechasavdhanmaharashtra

जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर बेड्या*

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपची तातडीने दखल घ्यावी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रयांकडे केली मागणी

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment