Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजराजकीय

शरद पवारांचा पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का ! संदीप नाईक यांच्या पक्ष प्रवेश होण्याची चर्चा

शरद पवारांनी अजित पवारांच्या व भाजपचे नेते गळाला लावून पुन्हा एकदा विधानसभेला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. दरम्यान, शरद पवारांनी पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का दिलाय.

नवी मुंबई (प्रतिनिधी)

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गणेश नाईक यांना बेलापूर विधानसभा आणि ऐरोली विधानसभा असे दोन तिकीट देण्याचा शब्द दिला होता अशी माहिती मिळते आणि आमदार मंदा मात्रे यांना बेलापूर विधानसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर नाराज असणारे संदीप नाईक यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शरद पवार गटात जाण्याचे जाहीर केले असे सूत्रांकडून माहिती मिळत आहे

 भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जातोय. नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी दि.22रोजी संदीप नाईक यांचा प्रवेश पार पडणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. संदीप नाईक यांना बेलापूर विधानसभेचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक  महायुतीचे ऐरोली विधानसभेचे उमेदवार तर संदीप नाईक बेलापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असेही बोलले जात आहे.

बेलापूर विधानसभेतील अनेक माजी नगरसेवक संदीप नाईक यांच्या बरोबर आहेत मग ते कुठल्याही पक्षात प्रवेश करू किंवा अपक्ष उभे राहू असं सूत्रांकडून बोलले जात आहे

व बेलापूर मतदारसंघांमधील संदीप नाईक समर्थकांनी संदीप नाईक हेच विजय होतील असे सांगितले जात आहे

तर दुसरीकडे मंदा मात्रे यांनीही कंबर कसली आहे विजय हा माझाच होणार

 

गणेश नाईक यांना विचारले असता यावर त्यांनी सांगितले की प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोणाला थांबू शकत नाही प्रत्येकाचा निर्णय घेण्याचा अधिकार व इच्छा वेगळी असते

येणारा काळामध्ये कोणाचं पारडं जड होते आणि कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते सर्व नवी मुंबईकरांचे लक्ष याकडे लागले आहे

 

Related posts

*कोपरखैरणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – गावठी कट्टा व ६ जिवंत काडतुसांसह तिघा आरोपींचा पर्दाफाश*

मनसे कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने कोपरखैरणे सेक्टर एक व दोन विभागातील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याला सुरुवा

jantechasavdhanmaharashtra

घणसोली सेंट्रल पार्क असुविधा च्या विळख्यात ?

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment