Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूज

*रबाळे एमआयडीसी पोलिसांचे धडाकेबाज कॉम्बिंग ऑपरेशन; देशी पिस्टल जप्त, 20 आरोपींवर गुन्हे*

*रबाळे एमआयडीसी पोलिसांचे धडाकेबाज कॉम्बिंग ऑपरेशन; देशी पिस्टल जप्त, 20 आरोपींवर गुन्हे*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

रबाळे : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या झिरो टॉलरन्स धोरणानुसार रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवून विविध अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान एका आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले असून अवैध दारू व गुटखा विक्री करणाऱ्या इसमांसह एकूण 20 आरोपींवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच वॉरंटमधील 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही मोहीम नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे तसेच परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या विशेष मोहिमेत परिमंडळ-1 मधील सात पोलीस स्टेशनमधील 4 पोलीस निरीक्षक, 14 पोलीस अधिकारी (एपीआय/पीएसआय) आणि 159 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.

दिघा, ईश्वरनगर, चिंचपाडा, रामनगर, साठेनगर, आंबेडकरनगर, यादवनगर, ठाणे-बेलापूर रोड तसेच रबाळे एमआयडीसी टीटीसी इंडस्ट्रियल एरिया आणि महापे एमआयडीसी परिसरात ही व्यापक मोहीम राबविण्यात आली. अमली पदार्थ विक्री व सेवन करणारे गुन्हेगार, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री तसेच इतर अवैध व्यवसायांवर एकाच वेळी धाड टाकून कठोर कारवाई करण्यात आली. यावेळी फरारी व पाहिजे आरोपींचा शोध, हॉटेल व लॉजेसमधील संशयास्पद व्यक्तींची तपासणी तसेच न्यायालयीन वॉरंट बजावणी करण्यात आली.

कारवाईदरम्यान दारूबंदी कायद्यांतर्गत 3 प्रकरणे कलम 65(ई) व 2 प्रकरणे कलम 85(1) अंतर्गत नोंदविण्यात आली. एनडीपीएस कायद्यान्वये अमली पदार्थ सेवनाच्या 3 केसेस तसेच अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1 केस दाखल करण्यात आली. तसेच अवैध गुटखा विक्रीची 1 केस, शस्त्रबंदी अधिनियमांतर्गत 2 केसेस, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 1 केस आणि कोटपा अधिनियमांतर्गत 5 केसेस नोंदविण्यात आल्या.

या मोहिमेदरम्यान 339 वाहनांची तपासणी करण्यात आली असून 72 वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच 15 पाहिजे व फरारी आरोपींची तपासणी करण्यात आली. परिसरातील 9 हॉटेल व लॉजेसची तपासणी करण्यात आली असून अभिलेखावरील 12 आरोपींची पडताळणी करण्यात आली.

या कारवाईत एका आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले असून त्याच्यावर आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अवैध अमली पदार्थ व गुटखा विक्री करणाऱ्या इसमांवरही गुन्हे नोंदविण्यात आले.

ही कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे तसेच रबाळे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल वाघमारे, पोलीस निरीक्षक कल्पना जाधव तसेच परिमंडळ-1, 2 आणि पोलीस मुख्यालयातील अधिकारी व अंमलदार यांच्या संयुक्त सहभागातून पार पडली.

रबाळे एमआयडीसी पोलिसांनी राबविलेल्या या प्रभावी कॉम्बिंग ऑपरेशनमुळे परिसरातील अवैध धंद्यांना मोठा आळा बसणार असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सतत दक्ष असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Related posts

एनएमएमटी बसला पुन्हा आग चालकाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना; 

jantechasavdhanmaharashtra

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित

अखेर म्हसवंडी बोर घाटाच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment