प्रतिनिधी अशोक लांडगे
नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांच्या आमदार निधीतून आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ९ रुग्णवाहिकांचे लोकार्पण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.कोरोना काळामध्ये अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वेळेत पोहोचण्यासाठी या रुग्णवाहिकेचा उपयोग होणार आहे हे सर्व रुग्णवाहिका महानगरपालिकेला सुपूर्त केले आहे. या ९ रुग्णवाहिके मध्ये आठ रुग्णवाहिका आमदार निधीतून तर एक रुग्णवाहिका गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे यामध्ये एक रुग्णवाहिका ही कार्डियाक रुग्णवाहिका असून ती ऐरोली मतदार संघातून सर्व प्रभागांमध्ये वापरली जाणार आहे, बाकी ८ रुग्णवाहिका जुहूगाव आरोग्य केंद्र पावणे, तुर्भे, खैरणे, दिघा, घणसोली, रबाळे, या आरोग्य केंद्राला देण्यात आली आहे गणेश नाईक यांच्या माध्यमातून यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी ग्रंथालयांना पुस्तके व महानगरपालिकेच्या आठ विरंगुळा केंद्रातील ज्येष्ठांना विरंगुळा साहित्य वाटप तसेच दिव्यांगांना राशन किट वाटप करण्यात आले या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रमेश पाटील, माजी आमदार नरेंद्र पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, पालिका आयुक्त अभिजित बांगर व भाजपचे माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील तीन पार्टीच्या सरकार यांना वाटते की नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तरी भाजपची सत्ता येईल त्यामुळे ते निवडणूक घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे त्यांच्या मते जेवढे जास्त दिवस जातील तेवढे बीजेपी चे सीट कमी होतील आणि त्याचा फायदा आम्हाला होईल पण असं काही होणार नाही कारण नवी मुंबई तील जनतेचा पूर्ण विश्वास बीजेपी वरती आहे कारण कोरोना काळामध्ये गणेश नाईक व मंदा मात्रे यांनी नवी मुंबई जनतेसाठी काम केलेले आहे राज्य सरकार त्यांना पाहिजे तेव्हा निवडणूक घेतात. आणि नको असल तर रद्द करतात असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, ज्या वेळी नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणूक होईल त्यावेळी भाजपचा झेंडा पालिकेवर फडकेन अशा स्पष्ट शब्दात विरोधकांना टोला लावला.

