घणसोली विभागात विविध ठिकाणी अतिक्रमणाचा सुळसुळाट कुंपणच शेत खात असेल!.. तर कारवाई कोण करणार? संतप्त नागरिकांचा सवाल!.
नवी मुंबई (प्रतिनिधी) घणसोली महानगरपालिका विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाचा सुळसुळाट, सुरू असून अनेक वेळा वृत्तपत्रांमध्ये चॅनलच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूज व बातम्या प्रसारित झाल्या ,तरीही घणसोली वार्ड अतिक्रमण विभागाने आतापर्यंत कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही.
फक्त समाजाच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकण्यासाठी तोटक व तुटपुंजी कारवाई करून जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा प्रयत्न केला आहे अनेक स्थानिक नागरिक स्टेशन मार्ग किंवा साईबाबा मार्ग व घणसोली आतील रोडवर अनेक वेगवेगळे विभागांमध्ये वडापाव , पाणीपुरी चिकन लॉलीपॉप असे अनेक प्रकारच्या गाड्या फुटपाथ वरती व रस्त्यावर सुद्धा लावल्या जातात तरीही ठोस कारवाई पालिकेने केलेली नाही रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांनी अनेक वेळा खंत व्यक्त केली पालिकेला तोंडी स्वरूपात तक्रारही केली, तरी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई न करता अनेक वेळा उडवाउडविचे उत्तर देत आम्ही कित्येक वेळा कारवाई केली पण ते लोक बसतात त्यावर आम्ही काय करणार ? असे उत्तर देत कुठेतरी आर्थिक व्यवहार होत असल्याची खंत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे पत्रकाराने किंवा सामाजिक क्षेत्रातल्या सामाजिक कार्यकर्ता ने पालिकेकडे तक्रार केली असता काही रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी अनेक वेळा मारण्याच्या धमक्याही दिल्या जातात कारण त्यांना पालिका अधिकारीच सबंधित तक्रारदाराचे नाव जाहीर करून मोकळे होत असत असे चित्र अनेक वेळा पहावयास मिळत आहे, त्यांना मदत पालिका अधिकारी करत असतील तर कोणताही सुज्ञ नागरिक या अतिक्रमणाबाबत तक्रारी करणार नाही असे मत समाज सेवकांचे आहे असे जर झाले तर यावरती नियंत्रण कोणाचे ? फेरीवाले यांच्या साठी कुठेतरी व्यवस्था केली पाहिजे त्यांना लायसन्स दिले पाहिजे त्यांचीही रोजी रोटीची सोया करणे गरजेचे आहे ,कारण गाळेधारक मोठ्या प्रमाणात महसूल देत असून त्यांनाही रस्त्यावर यायची वेळ आली आहे ,लाखो रुपय डिपॉझिट देऊन भाडेही द्यावे लागते त्याचबरोबर महानगरपालिकेचा कर भरला जातो, रोडवर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान ही सोसावी लागते अनेक वेळा पालिकेकडे त्यांनी तक्रार केली असता हा बघू ! करतो !सांगतो! असे उडवाउडवीचे उत्तर त्यांना पालिकेकडुन मिळतात अनेक दुकानदार कोरोनामुळे त्रस्त आहेत व्यवसाय नाही कधी लोकडाऊन लागते का या भीतीने त्रस्त आहे ,अनेक ठिकाणी तर गाळ्यांमध्ये व्यवसाय करायचा सोडून फुटपाथला काउंटर ठेवून व्यवसाय केले जातात, दुकान मोकळेच असते आणि व्यवसाय तर फुटपाथ वरती असतो अशा वेळेस महानगरपालिकेचे अधिकारी समोरून जात असतात पण कारवाई होत नाही कीती वेळा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी खंत व्यक्त केली, पण त्यावर कोणीही बोलायला मागत नाही ऑफिसरला विचारले असता त्यांनी असे उत्तर दिले गरीब लोक आहेत कोरोनाचे संकट आहे त्यांनी कुठे जायचे ,हो पण असे जर जबाबदार अधिकार्याने अनाधिकृत व्यवसाय करणाऱ्या बद्दल उत्तर दिले तर अधिकृत व्यवसाय करणाऱ्यानी काय करायचे असे मत स्थानिक नागरिक करतात,तरीही नागरिकांच्या मते जे कायद्यात बसत नाही त्यांना कुठेतरी दुसरी व्यवस्था करून द्यावी असे नागरिकांचे मत व दुकांदारांचेही मत आहे , गाळेधारकांनी त्यांचे भाडे भरण्यासाठी व्यवसाय झाला नाही? तर त्यांनी कुठे जायचं ! हा विचारही पालिकेने करावा नाहीतर यावर आयुक्तांनी तोडगा काढावा पालिका अधिकारी अनाधिकृत व्यवसायांना मदत करतात तसे आमच्या व्यवसायावरही कोरोनाचे संकट आहे आम्हालाही कर माफ करावा आम्ही काय करायचे असा सवाल गाळा धारकांनी मीडिया मार्फत आयुक्तांना विचारला आहे , जर तुम्ही रोडवरच्या अनाधिकृत विक्रेत्यांवर दया दाखवत असेल तर आम्हालाही करा मध्ये दया दाखवावी ही आयुक्तांकडे दुकान चालकांची विनंती आहे घणसोली गावामध्ये पालिकेने अतिक्रमण विभागा मार्फत अनेक वेळा कारवाई केली पण फक्त दाखवण्यापुरते ज्या इमारतींची कारवाई केली ती इमारत अतिशय दिमाखदारपणे उभी केलेली आपणास पाहावयास मिळत आहे
मग कारवाई करून उपयोग काय? एका व्यक्तीला कारवाई करायची आणि दुसरा व्यक्तीवर सहानुभूती दाखवायची ! कुठेतरी आर्थिक व्यवहार होत असल्याचा स्थानिक जनतेतून चर्चा होत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे! नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी थोडे लक्ष द्यावे अशी विनंती नागरिकांना मधून केली जाते

