प्रतिनिधी सतिश फापाळे
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील विविध गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर काम करत असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काँग्रेसचे गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी उल्लेखनीय काम केले आहे .
पठार भागातील विविध गावांना पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी दिल्याने पठार भागातील अनेक गावांची पाण्याची समस्या मिटणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,आमदार डॉ सुधीर तांबे यांचे मार्गदर्शनाखाली आणि यशोधन कार्यालयाचे प्रमुख इंद्रजित थोरात यांच्या पाठपुरव्याला यश आले आहे.
पठार भागातील म्हसवंडी गावासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी १०१.७६ लक्ष रूपये ,कुरकुंडी गावासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी १४३.२६ लक्ष रूपये,भोजदरी गावासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी १३८.७६ लक्ष रूपये,तसेच आंबी खालसा गावासाठी २ कोटी रुपयांचा निधी असा पठार भागासाठी ५ कोटी ८२ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.लवकरच पठार भागात पाणी पुरवठा योजनांच्या कामांना सूरवात करून पठार भागातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी दिली आहे.
तसेच घारगावासाठी १ कोटी ७० लाख रुपये मंजुर असून काम प्रगती पथावर आहे.तर वनकुटे गावासाठी ९० लाखाच्या निधीचे काम अंतिम टप्प्यात आहे.तर लवकरच निधी मंजूर असलेल्या गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सूरवात करून पठार भागातील इतर गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लावणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी सांगितले आहे.

