Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

नवीमुंबई पालिका आधिकारी कोपरखैरणे विभागात जाणून बुजून पाणी कमी सोडतात-!! शंकर मोरे

मा. नगरसेवक शंकर मोरे यांनी कोपरखैरणे पाणी प्रश्नांवर नवी मुंबई  आयुक्त यांना दिले निवेदन व मांडली आक्रमक भूमिका

गेले अनेक महिन्या पासून कोपरखैरणे विभागात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे . लोकांना वेळेत पाणी मिळत नाही ,मिळते ते तुटपुंजे ! 10 ते 15 मिनिटे तेही एकदम कमी दाबाने, कोपरखैरणे विभागातील लोकांची ग्रामीण भागातील लोकांसारखी परिस्थिती होती काय अशी वेळ आली आहे.

शंकर मोरे यांनी आयुक्तांना बोलताना सडेतोड शब्दात पालिका प्रशासना वरती ताशेरे ओढले . कोपरखैरणे येथे विचारणा केली असता त्या विभातील कर्मचारी सांगतात की आमच्या कडे पाणी कमी येते व प्रेशर कमी दाबाने असतो  तर मग पाणी विभागातील उच्च पदावर असणारे अधिकारी जाणून बुजून पाणी कमी सोडतात असे मत मोरे यांनी आयुक्तां समोर व्यक्त केले ,कुठे तरी कोपरखैरणे विभागात राजकारण  होते की काय असे कोपरखैरणेतील नागरिकांना वाटते .

यावर आमदार गणेश नाईक यांनीही आयुक्तांना त्यांचे अधिकारी व कर्मचारी  काय चूक करतात हे निदर्शनास आणून दिले व सर्वानाच पाणी मिळेल याची व्यवस्था कशी करता येईल या कडे लक्ष देण्याची गरज आहे असे खडसावून सांगितले .

यावर आयुक्तांनी लवकरच  काही तरी तोडगा काढू असे अस्वासन दिले.

या पाणी प्रश्नावर सावधान महाराष्ट्र वृत्तपत्र ने ही अनेक वेळा बातमीच्या माध्यमातून पालिकेचे लक्ष वेधले पण अजूनही काही पर्याय नाही .

आता नवीन आयुक्त राजेश नार्वेकर  हे कोपरखैरणे विभागाला न्याय देतील का ? या कडे सर्व नागरिकांनाचे लक्ष लागले आहे .

कोपरखैरणे मधील नागरिकांनी आमदार गणेश नाईक व  माजी नगरसेवक शंकर मोरे  यांचे आभार व्यक्त केले .

Related posts

वॉर्ड क्र 100 आर.आर.पाटील उद्द्यानाची म.न.पा अधिकारी यांनी केली पाहणी…

jantechasavdhanmaharashtra

एक हात मदतीचा* *अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुकामधी बेलापूर गावचे युवक आणि या कोरोना काळातील कोविड योद्धे श्री किसन पंढरीनाथ भोईटे,यांना कोरोना पॉझिटिव्ह मुळे प्राव्हेट हॉस्पिटल मध्ये एडमीट केले आहे त्यांची परिस्थिती एकदम हलाकीची असल्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे आपली एक मदत त्यांचे कुटुंब सावरू शकते*

नवी मुंबई परिवहन कार्यालयाचे चाचणी केंद्र नेरूळ येथे उपलब्ध करण्यात यावे ! निलेश कचरे

Leave a Comment