Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

दिघा येथे अनाथ आश्रम आहे! पण त्याला कोणी वाली नाही असं म्हणावं लागेल.

 

प्रतिनिधी साईराज मोरे

दिघा येथे अनाथ आश्रम पण त्याला कोणी वाली नाही असं म्हणावं लागेल.

देशात व राज्यात अनेक अनाथ मुलांचे आश्रम आहेत ज्यांना चांगल्या ट्रस्टचे समिती व मोठं मोठे उद्योजक यांच्या सहकार्याने ते चालवत असतात केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून योग्य ते पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा उपलब्ध करून घेतात.

परंतु नवी मुंबई येथे दिघा ऐरोली स्थित “प्रिशीला चिल्डरन्स होम”या नावाने रश्मी परब एक महिला भगिनी चालवत आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधल्यानंतर काही आश्रम बद्दल त्यांनी माहिती दिली ती म्हणजे १६ लहान मुलं सध्याला त्या आश्रम मध्ये राहत असून त्यांचे पूर्ण पालनपोषण रश्मी परब हे स्वतः करतात त्यांना वेळोवेळी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून मदत सुद्धा होत असते परंतु वर्षांवरसे काही वेळेस ते हतबल होतात त्यावेळेस त्यांना आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात होते.

कारण त्या आश्रम मध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे रूम, शौचालय, किचन, असे काही गोष्टी व लाईट बिल, टॅक्स,मुलांचे जेवण, कपडे, स्कूल फीस, ह्या सगळ्या दैनंदिन जीवनातील लागणारे गोष्टी त्यांची संपूर्ण पूर्तता करताना परब यांना खूप अडचणी निर्माण होत असतात.

म्हणून नुकत्याच काही युवापिढी यांनी त्या आश्रम मध्ये भेट देऊन लहान मुलांशी गप्पा मारताना त्यांची व्यथा ऐकून घेतली त्यांना फॅन, लाईट, आणि त्यांची भिंत पूर्ण पणे प्लास्टर हे पडले असून त्यांच्या जेवण्याच्या ताटात ती घाण पडते पावसात त्यांचे पत्रे गळतात असे काही महत्त्वाचे विषय आहेत. परंतु हे सगळ्या गोष्टी करण्यास त्यांच्या कडे आर्थिक मार्ग नसल्याने त्यांना हे सगळे दुःख सोसावे लागतात.

त्यामुळे युवापिढी मध्ये मंदार पवार,समीर हांडे,आनंद पार्टे,अमोल होजगे, विशाल अभंग,पियुष गाडे,प्रवीण जाधव,हरिओम,स्नेहा क्रिस्तुराज, तुलसी पवार,धीरज वैती,सोनाली नराळे,साईराज मोरे,अमित कुमार,वैजुनाथ देशमुख या सर्वांनी मा. आयुक्त नवी मुंबई महानगर पालिका प्रशासना कडे सदर च्या आश्रम मध्ये काही किरकोळ दुरुस्ती साठी शासन योजने अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण कामातून रंगरंगोटी व प्लास्टर चे काम करून देण्यास मागणी केली आहे तसेच माजी पालकमंत्री गणेशजी नाईक यांच्याकडे ही जाऊन संबंधित विषयवार चर्चा करून काही मदत मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.

Related posts

*महिलांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध! वनमंत्री गणेश नाईक*

*माजी आमदार संदीप नाईक यांचा भाजपमध्ये पुनर्प्रवेश; नवी मुंबईत राजकीय हालचालींना वेग*

jantechasavdhanmaharashtra

पत्रकारांना केव्हाही कधीही अडचण भासल्यास फक्त आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू – यशवंत सोरे

Leave a Comment