Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

पत्रकारांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांच्या विचाराची पत्रकारिता केल्यास समाजात नक्कीच बदल घडेल

 

*पत्रकारांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांच्या विचाराने पत्रकारिता केल्यास समाजात नक्कीच बदल घडेल* पी आय गजानन कदम यांचे प्रतिपादन!

 

नवी मुंबई प्रतिनिधी

समाज माध्यमांमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या वर्तमानपत्राच्या पत्रकारांनी आपली लेखणी न्याय हक्काच्या लढाईसाठी सातत्याने तेवत ठेवली तरच समाज माध्यमांमध्ये बदल घडण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही किंवा वेळ लागणार नाही त्यासाठी पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारधारणेनुसार पत्रकारिता केली तर नक्कीच समाजामध्ये बदल घडू शकतो

 

ते पुढे बोलताना म्हणाले की पत्रकार आणि पोलीस हे समाजाच्या हितासाठी काम करत असतात यावेळी कुठलीही घटना असो किंवा समाजाचे हित असो पत्रकाराने समाज हितासाठी पोलिसांना सहकार्य करावे, शोध पत्रिका करून सत्याची भूमिका मांडावी असे मत कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पीआय गजानन कदम यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारासमोर बोलताना आपले मत व्यक्त केले.


आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला गजानन कदम यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमात महाराष्ट्र गुन्हे तपास या साप्ताहिकाचे संपादक सुभाष जाधव,पत्रकार सुनील गायकवाड पत्रकार अरुण बिराजदार, यांनी देखील पत्रकारांच्या समस्या बाबतीत आपले मत व्यक्त केले.


दरम्यान : या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण, पत्रकार दिलीप लांडे, पत्रकार राजू मिर, पत्रकार वामन चव्हाण, पत्रकार प्रशांत ससाणे, दिलीप म्हात्रे, संतोष म्हात्रे, सतीश कोळी, योगेश चोरट, मोटार ट्रेनिंग स्कूल नवी मुंबई असोशियनचे अध्यक्ष मधुकर पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे आयोजन जनतेचा सावधान महाराष्ट्र या वृत्तपत्राचे मुख्य संपादक राजेंद्र बोडके व उपसंपादक कुंडलिक कानगुडे यांनी केले होते कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सूत्रसंचालन राजेंद्र बोडके यांनी केले.व कुंडलिक कानगुडे यांनी कार्यक्रमाची सांगता करून उपस्थित मान्यवर व पत्रकारांचे आभार व्यक्त केले.

Related posts

बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा,

ठाणे येथील सुनील यादव यांनी चांद्रयान ISROची प्रतिकृती साकारण्यात आली

jantechasavdhanmaharashtra

वडज गावामध्ये नवजवान गणेशोस्तव मंडळाची शिवजयंती उत्साहात साजरी

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment