Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

डम्पिंगच्या त्रासाला कंटाळून ठाण्यातील डायघर ग्रामस्थांनी व स्थानिक रहिवाशांनी निवडणुकांवर टाकला बहिष्कार

 

सहसंपादक अरुण बिराजदार

*डम्पिंगच्या त्रासाला कंटाळून ठाण्यातील डायघर ग्रामस्थांनी व स्थानिक रहिवाशांनी निवडणुकांवर टाकला बहिष्कार*

ठाणे:- सध्या देशात व राज्यात लोकसभा निवडणुक सत्र चालू आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाल्ले किल्ला मानला जानारा ठाण्याच्या शिळफटा येथे स्थित डायघर गावातून मतदान केंद्रावर आणि संपूर्ण निवडणूक सत्रावर ग्रामस्थांनी व स्थानिक रहिवासी यांनी बहिष्कार टाकला आहे, कारणही  तसे गंभीर आहे डायघर येथे बेकायदेशीर पणे महापालिका प्रशासनाने कचरा टाकण्यासाठी डम्पिंग तयार करून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो, स्थानिकांच्या मते आमच्यावर बळजबरीने लादले असून नागरिकांनी अनेक ठिकाणी तक्रार देऊन सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही शासन प्रशासन किंवा राजकिय नेते जाणीव पूर्वक लक्ष देत नाही.

सदर ग्रामस्थांनी व स्थानिक रहिवासी यांनी या संबधित स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक, व पालकमंत्री आणि विशेष करून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ,विरोधीपक्ष नेते,कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या समवेत सर्वाना रीतसर पत्रव्यवहार करून त्यांना न्याय मिळण्यासाठी खूप वेळा त्यांची भेट घेऊन चर्चा केली असता अध्याप या नागरिकांना अजून पर्यंत कुठलाही नेता किंवा प्रशासना कडून न्याय भेटला नाही व इतका दुर्दैवी प्रशासन आणि माजलेले अधर्मी राजकिय नेते झाले आहेत ज्यांना जनकल्याना साठी जनतेने निवडून दिले ते जनसेवक आज अश्या प्रकारे त्याच जनतेवर अन्याय करत आहेत, हे का ते रामराज्य असा सर्वत्र प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्य बाबी म्हणजे या प्रकल्पात होणारे कचऱ्याचे प्रक्रिया हे योग्य प्रमाणे होत नाही, महापालिके कडून मोठया प्रमाणात ओला कचरा या ठिकाणी टाकून घेतले जात आहे त्यामुळे समस्त ग्रामस्थ व इथे आजूबाजूला जे नव्याने वसलेले सोसायटी आहेत ज्या मध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक राहत असून लहान मुलं, वृद्ध व्यक्ती , तरुण या सर्वाना मोठ्या प्रमाणात उलटी, जुलाबाच्या आजाराणे त्रस्त झालेले आहे, एकीकडे स्वच्छतेवर करोड रुपये खर्च केला जातो आणि दुसरीकडे नागरिकांना स्वच्छतेमुळे आजाराला सामोरे जावे लागते हा तर जीवघेणारी स्वच्छता आहे की काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे? तरी सुद्धा सरकार जागी होत नाही , त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्रस्त होऊन हा निर्णय घेतला आहे की, डम्पिंग जो पर्यंत लोकवस्ती मधून हटत नाही तो पर्यंत आमच्या कडून निवडणूकांवर बहिष्कार कायम असेल, फक्त लोकसभा नाही तर विधानसभा असो महापालिका असो सर्वं निवडणूक मध्ये आमची हीच भूमिका राहील,त्यामुळे सर्व राजकीय पुढाऱ्यांनी लक्ष्यात घ्यावं. असे *डायघर ग्रामस्थ व स्थानिक रहिवासी* यांनी इशारा दिला आहे

कोट

आम्ही महाराष्ट्र प्रदूषण विभागाकडे रीतसर तक्रार दिली असून संबंधित विषय गंभीर पणे घेत आहोत त्यासाठी स्वतः माझा मुलगा न्यायालय प्रक्रिया मध्ये सहभाग होऊन डम्पिंग विरोधात सर्व कागत पत्र जमा करून कसे न्याय मिळवून घेता येईल या साठी पूर्ण ताकतीने काम करतोय.

– माजी नगरसेवक हिरा पाटील.

 

                           कोट
आमच्या कडून वारंवार तक्रारी करण्यात येत आहे संबंधित सरकारी जितके संस्था आहेत त्या सर्वांना कळवले तरी सुद्धा अधिकारी वर्ग यांनी आम्हाला न्याय दिला नाही त्यामुळे सर्वानी एकजूट होऊन निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला भविष्यात डम्पिंग हटवले नाही तर जवळपास लाखोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.

— *संतोष पाटील 

Related posts

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई ! वाहतुकीचे नियम मोडनारांवर होणार कडक कारवाई!*

jantechasavdhanmaharashtra

किड्स स्माईल प्री स्कूल तर्फे वार्षिक क्रीडा संमेलन उत्साहात साजरे

ऐरोलीचे राजमाता जिजाऊ रुग्णालय बनले स्वावलंबी!.आमदार गणेश नाईक यांनी दिला १ कोटीचा निधी

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment