Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजराजकीयशहर

*नवी मुंबई महापालिका निवडणूक 2025-26 : कोपरखैरणे विभागात उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ, सभागृहात गर्दी वाढली*

*नवी मुंबई महापालिका निवडणूक 2025-26 : कोपरखैरणे विभागात उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ, सभागृहात गर्दी वाढली*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे विभागातील प्रभाग क्रमांक 10, 11, 12 आणि 13 साठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज दिनांक 23 डिसेंबर 2025 पासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. अण्णासाहेब पाटील सभागृह, कोपरखैरणे येथे सर्वपक्षीय तसेच अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहत आहेत.

यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे

निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2025 असून, मर्यादित कालावधीत आवश्यक कागदपत्रे, शर्ती व अटी पूर्ण करण्यासाठी विशेषतः नवोदित आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मोठी कसरत करावी लागत आहे. उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असलेली शपथपत्रे, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, मालमत्ता विवरणपत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती, तसेच इतर वैधानिक कागदपत्रांची पूर्तता करण्यात उमेदवारांची धावपळ सुरू आहे.

अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी अण्णासाहेब पाटील सभागृह परिसरात उमेदवार, त्यांच्या समर्थकांसह राजकीय कार्यकर्त्यांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक विभागाकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येत असून, उमेदवारांना मार्गदर्शनासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

कोपरखैरणे विभागात यंदाच्या निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षांसोबतच नव्या चेहऱ्यांचा सहभाग वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे निवडणूक वातावरण अधिक चुरशीचे होण्याचे संकेत मिळत आहेत. आगामी काही दिवसांत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नवी मुंबई महानगरपालिका यांच्या निवडणूक यंत्रणेमार्फत नियमानुसार पार पाडली जात आहे.

 

दिनांक 23 डिसेंबर रोजी कोपरखैरणे विभागामध्ये पहिल्याच दिवशी  प्रभाग क्रमांक 10,11,12 व 13 या निवडणूक कार्यालय मधून दुपारी 3 वाजे पर्यंत 118 उमेदवारी अर्ज गेल्याची अधिकृत नोंद झाली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली

Related posts

शाळेच्या अल्लड वयातली धमाल गोष्ट `रंगीले फंटर` या आगामी चित्रपटातून उलगडणार आहे.

jantechasavdhanmaharashtra

सिडकोचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित : पावसाळ्यात २४x७ सेवा ! मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे

jantechasavdhanmaharashtra

वडज गावामध्ये नवजवान गणेशोस्तव मंडळाची शिवजयंती उत्साहात साजरी

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment