Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूज

*पनवेलमध्ये डंपरची स्कूल व्हॅन व रिक्षाला धडक;  मुलांसह जखमींची सुखरूप सुटका,*

पनवेलमध्ये डंपरची स्कूल व्हॅन व रिक्षाला धडक;  मुलांसह जखमींची सुखरूप सुटका, 

प्रतिनिधी :-जनतेचा सावधान महाराष्ट्र

पनवेल शहर वाहतूक शाखा हद्दीतील नवीन पनवेल सिग्नल येथे आज सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास सिग्नलवर उभ्या असलेल्या स्कूल व्हॅन व रिक्षाला पाठीमागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याने गंभीर अपघात झाला. या अपघातात स्कूल व्हॅन व रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघातानंतर स्कूल व्हॅनचे दरवाजे लॉक झाल्याने व्हॅनमधील मुले आत अडकून पडली होती. घटनास्थळी व आजूबाजूला उपस्थित असलेल्या पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत व्हॅनची काचेची खिडकी फोडून तसेच बाजूचे पाईप ओढून  मुलांना सुखरूप बाहेर काढले. ही संपूर्ण बचाव मोहीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे पार पडली. प्रसंगाची गंभीरता ओळखून त्यांनी तात्काळ योग्य सूचना देत बचावकार्य व वाहतूक नियमनावर लक्ष ठेवले, ही बाब विशेष कौतुकास्पद ठरली.

रिक्षाचालक रिक्षामध्ये अडकून जखमी अवस्थेत असल्याने रिक्षाची फ्रंट फ्रेम ओढून व अर्धवट फुटलेली काच तोडून त्याला बाहेर काढण्यात आले. अपघातातील जखमी रिक्षाचालक, त्याच्यासोबतचा प्रवासी तसेच स्कूल व्हॅनमधील दोन मुले यांना तात्काळ उपचारासाठी नील हॉस्पिटल पनवेल येथे दाखल करण्यात आले.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपर चालकावर मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र अनुचित प्रकार घडू नये म्हणून पनवेल शहर वाहतूक शाखेच्या स्टाफने तत्काळ हस्तक्षेप करून डंपर चालकास पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे सुरक्षितरित्या पाठवले.

या घटनेनंतर वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहिले. पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम कदम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर राहून वाहतूक नियमन सुरू ठेवण्यात आले. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे अल्पावधीत वाहतूक सुरळीत करण्यात आली.

अपघातग्रस्त वाहनांचे क्रमांक स्कूल व्हॅन MH46 BU 7123, रिक्षा MH46 CD 0995 आणि डंपर MH04 FP 9142 असे असून या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

Related posts

*पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व : वसंतराव मुंडे*

ऐरोली एमआयडीसी पाणी विभागावर महामोर्चा#*

वॉर्ड क्र 100 आर.आर.पाटील उद्द्यानाची म.न.पा अधिकारी यांनी केली पाहणी…

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment