Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसंपादकिय

संतोस शेळके ने मारली गगन भरारी!सलग तिन वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत झाला उत्तीर्ण

,*शिवा शेळके ने मारली गगन भरारी*,
,सलग तिन वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत झाला उत्तीर्ण ,

नवी मुंबई (प्रतिनिधी)
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील अशोक शेळके व सौ, शांता अशोक शेळके यांचे चिरंजीव संतोष (शिवा) अशोक शेळके याने एम पी एस सी, या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खडतर परीक्षेत सलग 3 वेळा बाजी मारली
इयत्ता 10 ला कोतुळेश्वर विद्यालयात तो केंद्र परीक्षेत प्रथम आला होता, त्यापुढील 11 वी 12 वी चेशिक्षण संगमनेर येथील श्रमिक महाविद्यालयात झाले, तेथेही तो प्रथम तर नंतर नासिक येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ला ही तो प्रथम आला होता,
त्याच्या अभ्यासातील प्रगतीमुळे त्याने पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदावरील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला, या परीक्षा देतांना यश त्याला थोड्याशा मार्काने हुलकावणी देत होते, पण तरीही त्याने जिद्द व चिकाटी, सोडली नाही, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, आई विडी कामगार तर वडील पेंटर काम करून प्रपंच पुढे नेत होते ,
परिस्थितीची जाणीव असलेला शिवा अहोरात्र अभ्यासात गर्क होता,
आणी तब्बल सहा वर्षाच्या खडतर परिश्रमानंतर त्याला आशेचा किरण सापडला,आणि त्याची क्लास टू मधून मंत्रालयीन कक्ष अधिकारी या पदावर नियुक्ती झाली,
त्याच वेळी 2022च्या एका परीक्षेचा निकाल काही अंतरावर लागणार होता,आणी तो निकाल हाती येताच त्याची राज्य विक्रीकर आयुक्त पदी निवड झाली,त्यानंतर ही त्याने परीक्षा देणें चालूच होते, आणी नुकत्याच जाहीर झlलेल्या 2023 च्यानिकालात तो पुन्हा एकदा क्लासवन अधिकारी झाला,पुर्वी च्या 2022 च्या निकालात त्याने 105 ही रँक मिळवली होती, तर आजच्या निकालात त्याने 47 रँक मिळविली आहे
त्यामुळे आता एका वरिष्ठ अशा उच्च
पदावर त्याची नियुक्ती होणार आहे,
शिवा शेळके याने अत्यंत खडतर परिस्थितीत मार्ग आक्रमण करीत शेवटी आपल्या ध्येयाला गवसणी घातली, आजच्या अभ्यासू व गरजू विद्यार्थ्यांना एक आदर्श घालून दिला आहे,
आपले ध्येय निश्चित करून आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास आपण इच्छित यश प्राप्त करू शकतो, त्यासाठी खडतर प्रवासातून अभ्यास करावा असे आवाहन गरजू व अभ्यासू विदयार्थ्यांना त्याने केले आहे
त्याच्या या खडतर प्रवासात अनेक नातेवाईक,मित्र यांनी सतत मदतीचा हात पुढे केल्याचे शिवा सांगतो, तर यात त्याच्या तिन्ही बहिणींचे व आई वडिलांचे अपार कष्ट विसरता येणार नाहीत,
शिवाच्या या निवडीचे तालुक्याचे कार्य सम्राट आमदार डॉ,किरणजी लहामटे,अगस्ती साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेशरावकोते,कोतुळ ग्रामपंचायतीचे सरपंच लोहकरे,उपसरपंच संजय देशमुख,रवींद्र आरोटे डॉ,अभिजित देशमुख, ग्रा, प, सदस्य हेमंत देशमुख,संजय लोखंडे,ब्राम्हणवाडा, ग्रामपंचायत उपसरपंच सुभाष गायकर गणेश पोखरकर सोमदास पवार, मुंबई पोलीस शहाजी चाचर मुंबई पोलीस संपतराव शिंदे,,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोकराव उगले, आदींनी अभिनंदन केले आहे,,,,,,,

Related posts

*सरपंचांची पाठ फोडली, कातडी सोलली, मारून मारून पाईपचे 15 तुकडे, सुदर्शन-प्रतिकने दिल्या नरकयातना*

*रबाळे पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन*

jantechasavdhanmaharashtra

मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद..आंदोलने मागे घेण्याचे देखील कळकळीचे आवाहन..

Leave a Comment