Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

आळेफाटा पोलिस स्टेशन मार्फत वाहन चोरी व घरफोडी संदर्भात सतर्कतेचा इशारा

आळेफाटा प्रतिनिधी:-

४ जिल्ह्यांच्या मध्यवर्ती असणारा आळेफाटा शहर मोठे झपाट्याने विकसित होत आहे ठाणे, पुणे ,नगर आणि नाशिक या मोठ्या जिल्ह्यांच्या दिशेने जाणारा मार्ग आळेफाटा आहे त्यामुळे हे शहर मोठ्या झपाट्याने विकसित होत आहे, त्याचबरोबर क्राईम व चोरी या गोष्टीला आळा घालण्यासाठी जुन्नर तालुक्यातील DYSP मंदार जवळे यांच्या नेतृत्वाखाली व आळेफाटा पोलीस स्टेशनचे निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या प्रयत्नाने

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालया अंतर्गत व आळेफाटा पोलीस स्टेशन मार्फत आळेफाटा विभागातील परिसरामध्ये वारंवार होणाऱ्या वाहनांच्या चोऱ्या व घरफोडी वर आळा घालण्यासाठी आळेफाटा पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनीही सतर्क राहून या गोष्टीला आळा कसा बसेल यावर मार्गदर्शन करण्यासाठी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील, सर्व हाऊसिंग सोसायटी व व्यावसायिकांना आळेफाटा येथील सौभद्र हॉल येथे एकत्र करून सुरक्षितता व सेफ्टी या गोष्टीवर मार्गदर्शन करून, आपल्या वाहनान संदर्भात व घरफोडी संदर्भात नागरिकांनी सतर्क कसे राहिले पाहिजे, यावरती मार्गदर्शन केले. व वाहन चोरी होऊ नये यासाठी वाहनांना जीपीआर सिस्टम लावावी व सुरक्षित ठिकाणी वाहन पार्किंग करावे व घरपोडी संदर्भात सांगताना सोसायटी असेल तर दोन्ही वेळेस सेक्युरिटी ठेवणे गरजेचे आहे. व त्या सेक्युरिटीला व्यवस्थित सुरक्षितता कशी करावी, याच्या सूचनाही दिल्या गेल्या पाहिजे व सुरक्षिततेचा विचार करता प्रत्येक सोसायटीमध्ये सुरक्षितेसाठी ccTV व सायरनही एक महत्त्वाचा उपाय आहे. ते पुढे बोलताना असेही म्हणाले की महिलांनी घराबाहेर फिरायला जाताना आपले दागिने सुरक्षित कसे राहतील याचीही काळजी घेतली पाहिजे नागरिकांना बोलताना त्यांनी सांगितले की आमचे पोलीस डिपार्टमेंट नेहमी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहातील, पण आपणही एक जागरूक नागरिक म्हणून सतर्क रहाणे गरजेचे आहे कुठलाही धोका आपणास आढळल्यास आमच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा किंवा 112 नंबरला कॉल करून कळवावे आपण आपली सुरक्षा स्वतः व्यवस्थित रित्या करू शकता त्यासाठी आम्ही सांगितलेले काही नियम आपण पाळावे त्यामुळे होणाऱ्या घटना आपण स्वतः टाळू शकता. पोलीस हे नेहमीच नागरिकांच्या सेवेसाठी असतात पण नागरिकांनीही आपले नैतिक जबाबदारी पार पाडावी, आणि पोलिसांना सहकार्य करावे.


व येत्या काही दिवसात ग्राम सुरक्षादल मार्फत गस्त पथक तयार करन्याचेही त्यानी नागरिकांना आव्हान केले.
मार्गदर्शन करताना नागरिकांच्या पण समस्या या संदर्भात ऐकून घेत असताना, अनेक सोसायटी मध्ये बांधकाम व्यावसायिक यांच्या कडून पण काही गोष्टीचा त्रुटी आहे त्या पूर्ण न झाल्या मुळे रहिवाशी त्रस्त आहे, तर त्या संदर्भात पण आळेफाटा पोलिस स्टेशनचे सिनियर नलावडे यांनी सांगितले की, ज्या सोसायटीमध्ये काही बांधकाम व्यावसायिक यांच्या कडून काही त्रास असेल तर तसे लेखी पत्र पण पोलीस स्टेशनला द्या त्यावरही  काही तरी पर्याय निघेल.

रूम भाड्याने देताना प्रत्येक रूम मालकाने भाडोत्र्याची माहिती पोलीस स्टेशनला देणे बंधन कारक आहे.

आळेफाटा विभागातील नागरिकांनी पोलिस स्टेशनचे सिनियर यशवंत नलावडे यांचे व त्यांच्या टीमचे कौतुक केले.
नलावडे यांनी चार्ज घेतल्यापासून आळेफाटा हद्दीत अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या अवळल्या व गुन्हेगारी वृत्तीच्या लोकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Related posts

*नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३, पनवेल यांनी हरवलेले २५ लाख रुपये किंमतीचे १२२ मोबाईल फोन नागरिकांना परत*

jantechasavdhanmaharashtra

हे शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करणारे* *- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

jantechasavdhanmaharashtra

झेप्टो कंपनीचे टू व्हीलर चालक अवैद्यरीत्या पार्किंग करत असल्यामुळे कोपरखैरणे वाहतूक शाखेची कारवाई

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment