Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजराजकीय

*घणसोली प्रभाग क्रमांक 09 जोरात आणि नाव चर्चेत आहे राजू थोरात……*

*घणसोली प्रभाग क्रमांक 09 जोरात आणि नाव चर्चेत आहे राजू थोरात……*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घणसोली प्रभाग क्रमांक 09 मध्ये समाजसेवक राजू थोरात यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या विभागात सक्रिय असलेले आणि माजी आमदार संदीप नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजू थोरात यांनी सातत्यपूर्ण समाजकार्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.

साईश्वर सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षांमध्ये 5000 हून अधिक महिला व नागरिकांसाठी शिर्डी साई दर्शन सोहळ्याचे यशस्वी आयोजन करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटवला आहे. धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क वाढला असून, विभागातील नागरिकांशी त्यांचे जवळपास 20 वर्षांचे नाते आहे.

घणसोली प्रभागातील पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच दैनंदिन नागरी समस्या समजून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी राजू थोरात नेहमीच पुढाकार घेत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. अनेक वेळा शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून त्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे “काम करणारा कार्यकर्ता” अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 09 मधून भारतीय जनता पार्टी कडून राजू थोरात यांना उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे. प्रभागाच्या विकासासाठी सक्षम, अनुभवी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा उमेदवार म्हणून नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक चर्चा सुरू आहे.

समाजासाठी निष्ठेने काम करणारा, सर्वधर्मीय नागरिकांना सोबत घेणारा आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवणारा चेहरा म्हणून राजू थोरात यांच्याकडे पाहिले जात असून, घणसोली प्रभाग क्रमांक 09 मधील राजकीय समीकरणांमध्ये त्यांची भूमिका आगामी काळात निर्णायक ठरेल, असे चित्र सध्या दिसून येत आहे.

 

Related posts

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दिल्ली येथे तिरंगा वाटप*

32 वर्षानंतर भाजपचा किल्ला ढासळला; कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबईतील विविध गुन्ह्या संदर्भात पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची पत्रकार परिषद

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment