Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

समाजसेवक निलेश कचरे यांच्या पाठपुराव्याला यश; सानपाड्यात पोलीस चौकी पुन्हा सुरू,

समाजसेवक निलेश कचरे यांच्या पाठपुराव्याला यश; सानपाड्यात पोलीस चौकी पुन्हा सुरू, 

प्रतिनिधी:- जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई (सानपाडा) – महाराष्ट्र राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली 9 एप्रिल 2026 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे पार पडलेला 14 वा जनता दरबार नागरिकांच्या समस्या सोडवणारा प्रभावी आणि लोकाभिमुख उपक्रम ठरला आहे. या दरबारात मांडण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेत प्रशासनाने जलद अंमलबजावणी केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सानपाडा विभागातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा मांडत समाजसेवक निलेश सोमाजी कचरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. सानपाडा पोलीस स्टेशनचे पाम बीच येथे स्थलांतर झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना सुरक्षा व तत्काळ मदत मिळण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर सेक्टर 8 मधील बाबू गेनू मैदान परिसरात पुन्हा पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.

या मागणीची गांभीर्याने दखल घेत सानपाडा पोलीस ठाण्याच्या वतीने तात्काळ कार्यवाही करण्यात आली असून सेक्टर 8 येथील मूळ ठिकाणी पोलीस चौकी पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. येथे उप पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी तसेच चार पोलीस अंमलदार दिवस व रात्रपाळीत नागरिकांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे सानपाडा परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेत मोठी वाढ होणार असून स्थानिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर जलद गतीने निर्णय घेण्याची कार्यपद्धती ही लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

दरम्यान, निलेश कचरे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सानपाडा विभागासाठी हा लोकउपयोगी निर्णय साकार झाला असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. जनता दरबार हा खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारा प्रभावी मंच ठरत असल्याचे चित्र या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

Related posts

वाहुतकीचे उल्लंघन काही दुचाकी चालक करत असल्याने नागरीकांना नाहक त्रास होत आहे!

*नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३, पनवेल यांनी हरवलेले २५ लाख रुपये किंमतीचे १२२ मोबाईल फोन नागरिकांना परत*

jantechasavdhanmaharashtra

*”बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ₹१५० कोटींच्या निविदेत विशिष्ट ठेकेदार यांच्यासाठी मक्तेदारी पध्दत: –अरुण बिराजदार

Leave a Comment