Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हाब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

राज्यात महावितरणा कडून वीज चोरीचे गुन्हे दाखल!! फोल्टी मीटरची तपासणी चालू

                 (विशेष प्रतिनिधी) प्रवीण हांडे     

महाराष्ट्र: वीज बिल थकबाकी वसुलीसोबतच महावितरणने आता शून्य ते ३० युनिटपर्यंत रिडींग दाखविणाऱ्या वीज मीटरची तपासणी सुरू केली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ४० हजार ६०६ मीटर खराब आढळून आले आहेत. नागपूर प्रादेशिक विभाग म्हणजेच विदर्भाचा विचार केला तर ३८ हजार मीटरची तपासणी करण्यात आली असून यापैकी ५१९० वीज मीटरमध्ये गडबड आढळून आली आहे. राज्यात असे एकूण ४३ लाख मीटर आहेत. यापैकी १.४० लाख मीटरची तपासणी करण्यात आली आहे. महावितरणने गेल्या महिन्यातच ही तपासणी मोहीम सुरु केली. आतापर्यंत औरंगाबादमध्ये २९,४०७ मीटरची तपासणी करण्यात आली. यापैकी ६४९१ मीटर खराब आढळून आले.
गुन्हे दाखल करणारकोकण विभागात ५२,२१४ मीटरपैकी ६९२० व पुणे प्रादेशिक विभागात तपासण्यात आलेल्या २०,६६५ पैकी ४ हजार मीटर खराब आढळून आले.तात्काळ कारवाई करीत या ग्राहकांना अचूक बिल दिले जात आहेत. उर्वरित मीटरची तपासणी सुरू आहे. ज्या २२,६०६ मीटरमध्ये योग्य रिडींग होत नव्हती त्यातील ८४१ ग्राहकांनी मीटरमध्ये गडबड केली होती. या सर्व ग्राहकांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित मीटर बदलविण्याची कारवाई सुरू आहे.

Related posts

*अनाधिकृत व मार्जिंग स्पेस  वापरणाऱ्या  व्यवसाईकांवरती तुर्भे वार्डची मोठी कारवाई*

jantechasavdhanmaharashtra

तर महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती*

jantechasavdhanmaharashtra

रिझर्व्ह बँकेने कर्नाळा ठेविदारांचा अंत पाहू नये!  ————  15 ऑगस्टपूर्वीच बँक अवसायानात काढावीः कांतीलाल कडू

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment