Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या क्लिपवर स्पष्टीकरण देताना आमदार निलेश लंके

अहमदनगर(प्रतिनिधी): पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आत्महत्येचा इशारा देण्याच्या ऑडिओ क्लिपवर पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी देवरे यांचे सर्व आरोप फेटाळून लावत देवरे यांचाच भ्रष्टाचार सिद्ध झाला असून चौकशी सुरू झाल्याने त्या हा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे लंके यांनी म्हटले आहे.
आमदार लंके यांनी म्हटले आहे की, माझ्या मतदारसंघातील तहसीलदारांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यांनी त्यामध्ये केलेले आरोप खोटे आहेत. उलट स्वत:चा बचाव करण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांचे अनेक भ्रष्टाचार सिद्ध झाले आहेत. नाशिकचे विभागीय महसूल अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी त्यांची चौकशी करून सरकारकडे अहवालही पाठविला आहे. त्यामुळे तहसीलदार हे खोटे आरोप करीत आहेत. यापूर्वीही जेव्हा जेव्हा त्यांच्या गैरकारभाराची प्रकरण समोर आली, तेव्हाही त्यांनी असाच प्रकार केला आहे. अशाच पद्धतीच्या क्लिप व्हायरल केलेल्या आहेत.

प्रकरण समोर आल्यावर मी त्यांना सूचित करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी मला रात्री अपरात्री मेसेज पाठवून आत्महत्या करण्याची धमकी दिलेली आहे. आताही त्या लोकप्रतिनिधींसह सर्वांनाच दोषी धरत आहेत. त्या ज्या महसूल विभागात काम करीत आहेत, त्यातील कोणावरच त्यांचा विश्वास दिसत नाही. त्यांचे एकट्याचेच काम संत महंतासारखे आहे काय? त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत. त्यांची सखोल चौकशी होत आहे, त्यातून बचाव करण्यासाठी त्यांची ही केविलवाणी धडपड सुरू आहे, असेही लंके यांनी म्हटले आहे.

Related posts

जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर बेड्या*

केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रुपये सूट द्यावी

आमदारासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करत आत्महत्येचा इशारा, पारनेरच्या तहसिलदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment