Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हाब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

जेल ला जेल न समजता एक कुटुंब म्हणूनच मी काम केले …..त्याची पोहच पावती मला मिळाली – तानाजी घरबुडवे

            (नवी मुंबई प्रतिनिधी)अस्तेअलम मीर

 

तळोज्या जेलचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी तानाजी घरबुडवे हे सेवानिवृत्त झाले असून तळोजा जेल मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की आमच्या बरोबर गेले अनेक वर्षे काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन करत होते आणि कायद्याचे पालन करून सर्वांना सहकार्य करत होते जेल मधील कैद्यानीही त्यांच्या चांगल्या कामा बद्दलच्या भावना व्यक्त केल्या असे त्यांनी सांगितले


ते नेहमी त्यांच्या कडे गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने आपली गुन्हेगारी प्रवृत्ती बदलावी हीच भावना व्यक्त करत असे जेल मधून बाहेर जाताना आपण एक चांगले नागरिक बनऊन समाजात आपली प्रतिमा उंमटावी असा संदेश ते नेहमी कैद्यांना देत असत आणि अधिकारी व कर्मचारी यांना नेहमी आपल्या कुटुंबा प्रमाणे वागणूक देत असत
तानाजी घरबुडवे यांनी बोलताना सांगितले की मी 38 वर्ष नोकरी करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आले पण मी कधी खचलो नाही प्रामाणिक पनाने नोकरी करत असल्या मुळे मला येणाऱ्या अडचणींना मी सामोरे जात होतो ते पुढे बोलताना हेही म्हणाले की मी नोकरी करत असताना मला माझ्या कुटुंबाने खूप मोठी साथ दिली त्या मुळे मी हि नोकरी जेल न समजता एक कुटुंबच समजून काम केले ,म्हणून मला आज सर्व अधिकारी आणि कर्मचारी व महिला कर्मचारी यांनी व अनेक ठीकानाहून फोन द्वारे शुभेच्छा आल्या मी आज चांगले काम केले याची मला पोच पावती मिळाली असे वाटते अशा भावूक शब्दात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या


या वेळी जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्रा तर्फे मुख्य संपादक: राजेंद्र बोडके व तळोजा कारागृह SP – दत्तात्रय गावडे यांच्या हस्ते त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मान पत्र देण्यात आले .
या वेळी उपस्थित जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचे उपसंपादक – कुंडलिक कानगुडे , विशेष प्रतिनिधी – राजू भाई(अस्तेअलम मीर) , समाजसेवक – दत्ता पाटील,उमेश विश्वकर्मा आदी.

Related posts

*नवी मुंबई महापालिका निवडणूक 2025-26 : कोपरखैरणे विभागात उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ, सभागृहात गर्दी वाढली*

jantechasavdhanmaharashtra

कोपरखैरणे पोलिसांची जलद कारवाई : मोबाईल स्नॅचिंग प्रकरणातील सराईत गुन्हेगारास अटक; २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

jantechasavdhanmaharashtra

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा व कोकण विभागानी सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टी पावसामुळे पूरग्रस्तांना केली जीवणावशक वस्तूंची मदत

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment