Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्रीडाजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमनोरंजनमहाराष्ट्रशहर

जादुगार पी.बी.हांडे याची “मँजिक बुक आँफ रेकाँर्ड” मध्ये नोंद*

 

                      विशेष प्रतिनिधी (प्रवीण हांडे)

*जादुगार हांडे महाराष्ट्राचे भुषण – आमदार प्रशांत ठाकूर*

सुप्रसिद्ध जेष्ठ जादुगार,सामाजिक कार्यकर्ते, लोकसारथी चे संपादक जादुगार पी .बी. हांडे याची नुकतीच मँजिक बुक आँफ रेकाँड मध्ये नोंद झाली आहे.सदरची नोंद त्यांनी खोपोली ते पनवेल ३६ कि.मी.डोळ्यावर पट्टी बांधून मोटारसायकल चालविण्यासाठी च्या राष्ट्रीय एकात्मकतेसाठी केलेल्या धाडसी ऊपक्रमासाठी झाली आहे.
पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदर प्रसंगी सन्मान करताना जादुगार हांडे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भुषण व प्रबोधनकार असल्याचे गौरोद्गगार काढले.
राष्ट्रीय एकात्मकतेसाठी केलेल्या या ऊपक्रमात वेगवेगळ्या राज्यातील वेशभुषा परिधान केलेले मोटारसायकल स्वार होते. त्यांच्या हातात अंधश्रद्धा, भ्रष्टाचार विरोधी, हुंडाबळी, व्यसनमुक्ती,पर्यावरण संरक्षण, आरोग्य या आशयाचे सामाजिक प्रबोधनाचे फलक होते.
जादुगार हांडे यांनी *जादुची दुनिया* या स्टेज जादु प्रयोगाचे ५००० च्या वर कार्यक्रम सादर करून शेकडो सामाजिक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे
*रहश्य चमत्काराचे* या अंधश्रद्धा निर्मुलन सहप्रयोग व्याख्यानाचे महाराष्ट्रात विद्यालये,महाविद्यालये,महिला मंडळे,सामाजिक संस्था मध्ये ६५० कार्यक्रम सादर करून अंधश्रद्धा निर्मुलनाचे प्रभावी काम गेली ३२ वर्षे करत आहेत.
कला व सामाजिकक्षेत्रातील योगदानबद्दल त्यांना भारत सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या पुरस्कारासोबत विविध राज्य स्तरीय व राष्ट्रीय संस्थानी १२७ पुरस्कारांनी सन्मानित केले आहे
सदर रेकाँड नोंद झाल्या बद्द्ल त्यांच्यावर सामाजिक ,शैक्षणिक,राजकीय, कला, क्रीडा सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related posts

म्हसवंडी, आंबीखालसा, कुरकुंडी भोजदरी, गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दिल्ली येथे तिरंगा वाटप*

महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५–निलेश कचरे यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान; पुणे येथे होणार भव्य सोहळा!

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment