Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांना मातृशोक*

*विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांना मातृशोक*

अकोले – विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांच्या मातोश्री गं.भा.राहीबाई भाऊराव गायकर (वय ९३) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना,जावई, नातवंडे, पतवंडे, असा मोठा परिवार आहे. शंकरजी व पांडुरंग गायकर सर यांच्या त्या मातोश्री होत. ब्राम्हणवाडा (ता.अकोले) येथील दत्तनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र विहिंप प्रांतमंत्री संजय मुद्राळे, विहिंप पूर्णकालीन कार्यकर्ते संजय कुलकर्णी, प्रांत कोषाध्यक्ष धनाजी शिंदे, प्रांत सोशल मिडियाप्रमुख मुकुंद चव्हाण, प. महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख अमोल भांबरकर, विहिंप प. महाराष्ट्र प्रशिक्षण प्रमुख श्रीनिवास अमृतवाड, दक्षिण नगर जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे, सहमंत्री प्रा.गौतम कराळे, नवी मुंबई जिल्हामंत्री लालचंद मलिक, संगमनेर बजरंग दल संयोजक कुलदिप ठाकूर, सामाजिक समरसता प्रमुख अश्विन बेल्हेकर, बजरंग दल पुणे विभाग संयोजक नितीन वाटकर, उत्तर नगर जिल्हा सहमंत्री विशाल वाकचौरे, विहिंपचे प्रशांत बेल्हेकर, अकोल्याचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अगस्ती दुध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, भाजपा तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, युवा अध्यक्ष राहुल देशमुख, अकोले तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर, नितीन दांगट, बाळासाहेब मुळे, प्रदीप भाटे, प्रमोद लहामगे आदींसह महाराष्ट्रातून संघ परिवारातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

राहीबाई यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, विहिंपचे राष्ट्रीय मंत्री मिलिंद परांडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार गणेश नाईक ,आर्थिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन) अध्यक्ष  नरेंद्र पाटील, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, विहिंप क्षेत्र संघटन मंत्री श्रीरंग राजे, बजरंग दल क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी, विहिंप प्रांत संघटन मंत्री अनिरुध्द पंडित,वकील अभय अगरकर, क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे, प. महाराष्ट्र मातृशक्ती संयोजिका वकील मृणालिनी पडवळ यांचेसह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

Related posts

नगर-पुणे ‘वरील वाहतूक व्यवस्थेत बदल

निवडणूक कितीही लांबवा …..पालिकेवर भाजपचाच झेंडा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

jantechasavdhanmaharashtra

ऑपरेशन ऑल आउट दरम्यान नवी मुंबई पोलिसांचा गुन्हेगारांवर पंच, तब्बल ३९० जणांवर कारवाई

Leave a Comment