कोपरखैरणे वाहतूक पोलिसांचे वाहन धारकांना आव्हान! वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवरती कडक कारवाई.. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे
नवी मुंबई / कोपरखैरणे मध्ये वाहतुकीचा प्रश्न दिवसान दिवस वाढतच चालला आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी वाहनांची पार्किंग वरती तोडगा काढण्यासाठी व ट्रैफिक जामला आळा घालण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विश्वास भिंगारदिवे यांनी ज्या कारणामुळे ट्राफिक जाम होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याचे कारणे शोधत सेंट मेरी स्कूलमध्ये एकूण

३२ शाळेच्या मुख्याध्यापकांची
बैठक घेऊन वाहतुकीचे निरासन करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
एकाच वेळी शाळा सुटल्या मुळे अनेक शाळा ह्या आजूबाजूलाच आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम होते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुटण्याची वेळेमध्ये 10 ते 15 मिनिटे थोड्या प्रमाणात बदल करून विभागातील ट्राफिक जाम वरची समस्या सुटू शकते. एकच वेळी शाळा सुटल्या कारणा मुळे पालकांची गर्दी व वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याकारणाने ट्रॅफिक जामचा फटका अनेक नागरिकांना सहन करावा लागतो त्यामुळे शाळेच्या वेळेमध्ये बदल केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न नक्कीच सुटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वाहतूक निरीक्षक भिंगारदिवे यांनी व्यक्त केला. दरम्यान शाळेकरी मुलांना विद्यार्थ्यांना शाळेमध्ये सोडण्यासाठी येणाऱ्या स्कुल व्हॅन व इतर बसेस योग्य रीतीने पार्किंग कराव्यात जेणेकरून कोणत्याच
वाहतूक कोंडीला अडथळा निर्माण होणार नाही व शाळेच्या बसेस शाळेने ग्राउंड मधेच पार्क कराव्यात,आणि जवळपास राहत असलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी शक्यतो वाहनाचा उपयोग जवळ अंतर असल्यास शक्यतो टाळावा. म्हणजे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही व आपले विद्यार्थी वेळेत व सुखरूप शाळेत पोहचण्यास मदत होईल , शाळेच्या व्यवस्थापनाने शाळेबाहेर आपले सुरक्षा रक्षक उभे केल्यास शाळा परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल याकरिता शाळा व्यवस्थापकाने सुद्धा लक्ष दिले पाहिजे.व स्कुल बस आणि स्कुल व्हॅन यांचा विद्यार्थी सुटण्याचा टायमिंग व पाल्यांचा मुलांचा सुटण्याच्या टायमिंग मध्ये बद्दल असावा म्हणजे पाल्य आपली वाहने अगोधर येऊन पार्क करणार नाही याचाही शाळा व्यवस्थपकाने काळजी घेतली पाहिजे. शाळा व्यवस्थापनाच्या ही काही समस्या त्यांनी सांगितल्या यावरही योग्य तोडगा काढून .अशा विविध प्रकारच्या सूचना देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी बोलताना असेही सांगितले की वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनास समस देऊनही नाही ऐकल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल,
गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबई वाहतूक विभागातर्फे, पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या आदेशाने व कोपरखैरणे वाहतूक विभागाचे पोलीस सहाय्यक निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी कोपरखैरणे विभागाचा चार्ज घेतल्यानंतर वाहतुकीच्या समस्यांवरती अनेक वाहनधारकांना मार्गदर्शन करून वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले व स्वतः कोपरखैरणे च्या प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांसोबत फिरून वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल यावरती लक्ष केंद्रित केले आहे .
कोपरखैरणे विभागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी केल्याबद्दल कोपरखैरणे विभागातील नागरिकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांचे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले आहे

