घणसोली मध्ये तामिळनाडू राज्यात स्थित आदीयोगी महादेवाची प्रतिमा गणेशोत्सव निमित्ताने घणसोलीकराना बघायला भेटलं अस म्हणावा लागेल.
जनतेचे सावधान महाराष्ट्र:-सह संपादक अरुण बिराजदार
घणसोली:-गणेश चतुर्थी निमित्ताने अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मंडप सजवले आहेत कोणी बालाजी तिरुपती तर कोणी शिर्डी साईबाबा च्या मंदिराची देखणी प्रमाणे सजवले परंतु घणसोली मध्ये “सावित्री महिला सामाजिक संस्था, नगरसेवक घनश्याम मढवी मित्र मंडळ, व भूमिपुत्र कामगार संघ, या सर्व संघटने यांनी मिळवून घणसोली चा बापा असे प्रथम वर्षी तामिळनाडू येथे स्थित आदीयोगी महादेव यांची असलेली प्रतिकृती हे गणेश भक्तांना दर्शनासाठी गणेशाची मूर्ती स्थापन केली असून या ठिकाणी अनेक राजकिय नेते, पत्रकार बंधू, सामाजिक कार्यकर्ते व डी मार्ट घणसोली चे प्रतिनिधी शर्मा जी, असे अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
नगरसेवक घनश्याम मढवी यांनी बोलताना असे व्यक्त केले ही कलाकृती माझ्या पत्नीच्या विचार आणि बुद्धीने सजवण्यात आले हे सजवताना त्यांचे खूप मोठा योगदान आहे आणि त्यांची स्वतःची अशी आशा होती गणेश भक्तांना एक असा वेगळा देखावा बनवावा त्यांनी दर्शन घेताना घनसोलीत नाही तर एक वेगळ्या राज्यात येऊन गणपती व महादेवाच दर्शन घेत आहोत असं प्रतीत होईल.

