Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयशहर

वाॅर्ड क्र. १०० मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ व उदघाटने संप्पन्न.

*वाॅर्ड क्र. १०० मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ व उदघाटने संप्पन्न.

वाॅर्ड क्र. १०० चे मा.नगरसेवक तथा सभागृह नेते श्री.रविंद्र इथापे यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या कामांचा शुभारंभ व परिपूर्ण झालेल्या कामांची उदघाटने मा.स्थानिक नगरसेवक श्री.रविंद्र इथापे व मा.नगरसेविका सौ.सुरेखा इथापे,तसेच जेष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते संप्पन्न झाली. यामध्ये


१) उरणफाटा येथे आकर्षक असे स्लिपींग लेडी फाऊंटन
२) भिमाशंकर,उरणफाटा येथे जेष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड व वाचनालय
३) शैलेश टाॅवर्स ते माधवी सोसायटी पर्यंतच्या गटाराची व फुटपाथची सुधारणा
४) वंडर्सपार्क समोरील झाडांभोवती कठडे बांधने
५) से.१९ व सेक्टर १९ए मधील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचे लोकार्पण
६) नवदुर्गा सो.समोरील,अयंग्गार बेकरी (यशवंतराव चव्हाण मैदान) व आम्र मार्गावरील दोन अशा चार हायमास्टचे लोकार्पण


या कामांची सुरूवात व उदघाटने करण्यात आली.याप्रसंगी भिमाशंकरचे चेअरमन रमेश पवार,अशुत्तोष हांडे,रंगराव पाटील,संतोष चासकर,भाजपा वाॅर्डअध्यक्ष रवि डेरे,महिला वाॅर्डअध्यक्ष योजना नलावडे,सिमा हांडे,भाजपा तालुकाउपाध्यक्ष जयेश थोरवे,रविंद्र हांडे,संतोष फापाळे,भालचंद्र माने,अंकुश चव्हाण,विजय साधवाणी,राहुल इथापे,भिमाशंकर सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष म.म.नायकोडी,लक्ष्मण कोरडे,अशोक हिंगे,विश्वनाथ गावडे,भरत हांडे,प्रकाश सरंबळे,सुनिल बनखिळे,भिमराव पाटील, उत्तम पानसरे,शिवाजी औटी, वाबळे,थोरात ,शिंदे,हांडे, उतेकर,एच.एन प्रसाद,आर.एन.मिश्रा,चंदु नायर,रमेश आहुजा,प्रकाश मोरे,फडतरे,कांबळे,देवराम मुळे,तानाजी मुळे,बजरंग शेळके,अशोक नलावडे,सुखदेव ढगे,व इतर नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी रविंद्र इथापे यांनी सांगितले की उरणफाटा हे नेरूळचे व आपल्या वार्डचे प्रवेशद्वार असुन या परिसराचे सुशोभीकरण,सायकल ट्रॅक व टेस्टिंग ट्रॅक समोरील सुशोभीकरण,वंडर्सपार्क समोरील रस्त्याची फुटपाथ,केबल डक्ट व रस्त्याचे काम आणि विविध चौकामध्ये हायमास्ट व सीसीटीव्ही कॅमेरे हि कामे करणे गरजेचे होते व ती गेल्या वर्षभरात आयुक्तांच्या मागे लागून आपण मार्गी लावल्याने अनेक नागरिकांनी माझ्याकडे समाधान व्यक्त केले आणि येत्या काही दिवसातच आपण वंडर्सपार्क देखील सुरू करीत असल्याचे श्री रविंद्र इथापे यांनी सांगितले.

Related posts

*वाशी वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम; नियमभंगावर कडक कारवाई करत रस्ते सुरक्षेला प्राधान्य*

jantechasavdhanmaharashtra

बंदुकीचा धाक दाखवून बिल्डिंग कंट्रक्शन साइटवर फायरिंग करणाऱ्या दोन आरोपींना रबाले पोलिसांनी केले गजाड !

jantechasavdhanmaharashtra

*पनवेलमध्ये डंपरची स्कूल व्हॅन व रिक्षाला धडक;  मुलांसह जखमींची सुखरूप सुटका,*

Leave a Comment