*अतिक्रमण विभागामार्फत बेलापूर विभागात धडाकेबाज कारवाई*
नवी मुंबई (प्रतिनिधी)
डॉ.अमोल पालवे, सहा.आयुक्त यांच्याकडे नेरूळ वार्ड ची जबाबदारी असताना अतिशय चोख पणे अतिक्रमण आणि फेरीवाल्या बाबत कडक कारवाई करून नेरूळ रहिवाशांना न्याय देण्याचे काम केले आणि आता पुन्हा बेलापूर विभागाची जबाबदारी आल्यानंतरही त्यांनी एका मागून एक अनेक अतिक्रमण विभागाच्या कारवाई करत भूमाफियांचे धाबे दणाणले
नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूर अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
आदेश वाघमारे, घर क्र. 404, सेक्टर-20, बेलापूर गांव, 2) महेश मोतीराम कुंभार, घर क्र.706 सेक्टर-19, शहाबाज गांव, बेलापूर 3) प्रशांत जोशी, घर क्र. 594,सेक्टर-20, बेलापूर, 4) नान्हे अब्दुल अन्सारी, घर क्र.0574, सेक्टर-19/बी, फणसपाडा बेलापूर 5) मधुकर चंदर म्हात्रे व इतर, भु.क्र.बी-335 व बी-336, सेक्टर-20, बेलापूर, नवी मुंबई येथील अनधिकृत बांधकामास ए विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत.
तसेच त्याअनुषंगाने संबधितांनी वरील, केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
ए विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन बेलापूर येथील MRTP कलम 54 अन्वये नोटीसा बजाविण्यात आलेल्या 05 अनधिकृत बांधकामांवर नमुंमपा व सिडको कडील अधिकारी/ कर्मचारी यांचे संयुक्तपणे निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
या धडक मोहिमेसाठी डॉ. अमोल पालवे, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी- बेलापूर, यांचे नियंत्रणाखाली तसेच श्री. आत्माराम काळे, कनिष्ठ अभियंता व श्री. रमेश राठोड,प्रशासकीय अधिकारी यांचे उपस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकाम निष्कासनाच्या कारवाई करीता उपस्थित होते. ए विभाग कार्यालय अंतर्गत बेलापूर विभागातील अधिकारी/ कर्मचारी, मजूर-15, मुकादम-01, जेसेबी-01, हॅमर – 02 व गॅसकटर – 01 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.
तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.असे सहा आयुक्त डॉ अमोल पालवे यांनी बोलताना सांगितले

