Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

नवी मुंबई महापालिका कोपरखैरणे अतिक्रमण विभागा तर्फे कारवाईचा धडाका

नवी मुंबई महापालिका कोपरखैरणे अतिक्रमण विभागा तर्फे कारवाईचा धडाका

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली व कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त .सुनिल काठोळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाने कोपरखैरणे विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत 1)पांडुरंग हरी पाटील/श्रीम.लक्ष्मी पांडुरंग पाटील,SS टाईप,रूम नं 907,सेक्टर- 4,कोपरखैरणे,नवी मुंबई., व 2) आनंदा सखाराम भिलारे,SS टाईप,रूम नं 932,सेक्टर-4,कोपरखैरणे,नवी मुंबई. यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर तोडक कार्यवाही करण्यात आली.
तसेच कोपरखैरणे सेक्टर 1 येथील फ्ल्यायओवर च्या खालील बेघर व कोपरखैरणे रेल्वेस्टेशन च्या अंडरपास ब्रिज च्या खालील बेघर लोकांचे सामान डम्पिंग येथे जमा करण्यात आले. एकूण 32 झोपड्या निष्कासित करण्यात आल्या.
सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त .सुनिल काठोळे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत धोत्रे व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी 9 मजूर, 02 इलेक्ट्रॉनिक हॅमर, गॅस कटर 01,पिकअप व्हॅन 01,जे.सी.बी 01 वापर करण्यात आले.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. असे कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त .सुनिल काठोळे यांनी सांगितले

Related posts

मा.ई प्रभाग समिती सदस्य डॅा.प्रतिक तांबे यांचा ५० वा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

jantechasavdhanmaharashtra

अनाधिकृत वाहन पार्किंग, करून रस्ता जाम केल्यास होणार कडक कारवाई !!पोलिस निरीक्षक विमल बिडवे..

jantechasavdhanmaharashtra

जबरी लॅपटॉप बॅग.. चोरीचा आरोपी रंगेहात पकडले

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment