Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

मा.ई प्रभाग समिती सदस्य डॅा.प्रतिक तांबे यांचा ५० वा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

*मा.ई प्रभाग समिती सदस्य डॅा.प्रतिक तांबे यांचा ५० वा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

 


.नवी मुंबई प्रतिनिधी

डॉक्टर पेशा  असूनही सामाजिक बांधिलकी जपत डॉ.प्रतीक तांबे यांनी समाज्याची सेवा करत नवी मुंबई मध्ये सामाजिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करून नवी मुंबईतील सर्व डॉक्टरांना एकत्र करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेऊन  सामाजिक हित जोपासत असतात या समाजउपयोगी कामामुळे नाईक साहेबांच्या माध्यमातून त्याना इ प्रभाग समिती मध्ये काम करण्याची संधी मिळाली जनतेच्या मते राजकीय क्षेत्रातही असे डॉक्टर यांनी आले पाहिजे कारण आरोग्य विभागाचे सभापती हे डॉक्टरच असावा असे मत व्यक्त करत कार्यकर्त्यांनी त्याना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  नवी मु्ंबई महानगरपालिका ई प्रभाग समिती सदस्य,व हिम्पाम, महाराष्ट्र होमिओपॅथिक डॅाक्टर संघटनेचे सहसचिव,नवी मु्ंबई हिम्पाम चे अध्यक्ष,आदित्य हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सोसायटी,नवी मु्ंबई या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॅा.प्रतिक तांबे यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.
प्रतिभा इन्स्टिट्युट ॲाफ नर्सिॅग,नवी मु्ंबई यांनी वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.नवी मु्ंबई महानगनपालिका आरोग्य विभाग व डॅा.प्रतिक तांबे यांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे प्रशासक डॅा.एस.टी.गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी श्री.दिपक औटी,समाजसेवक श्री.कचरे डॅा.एम.बी.चौधरी,डॅा.एम.आर.काटकर,डॅा.रुपाली गोसावी,डॅा.माधूरी कोळी,प्रतिभा इन्स्टिट्युट च्या संचालिका डॅा.विजया तांबे,प्राचार्या सौ.रत्ना देवरे,व्यवस्थापक श्री.किरण शेडगे,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts

मुख्य रस्त्याच्या मधून रस्ते काढण्यात आले जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करताना.

जनतेच्या सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या बातमीची दखल ! म्हसवंडीतील जीवघेणा प्रवास थांबण्याचीअपेक्षा.

jantechasavdhanmaharashtra

दसऱ्यामुळे भाजीपाल्याचा भाव उतरला

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment