Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

घणसोली नोड मध्ये नागरिकांना अनेक अडचणींना जावे लागते सामोरे ! अनेक नागरी सुविधा फक्त कागदावरच

 

सहसंपादक अरुण बिराजदार

घणसोली नवी मुंबई: घणसोली म्हटलं की देशभर हे नाव पोहोचले आहे कारण या ठिकाणी जिओ चे मुख्य कार्यालय स्थित असून अनेक मोठ्या आयटी कंपनी सुद्धा आहे. म्हणून घणसोली देशभरात हे नाव प्रसिध्द झाले आहे.

परंतु इथले स्थानिक प्रशासन महापालिका आणि सिडको यांना घणसोली च्या अनेक समस्या दिसून येत नाही का? इथे मोठ्या संख्येने बाहेरून जनसमुदाय येऊन वसले असून आजही घणसोलीकरांना वीज समस्या, पाणी समस्या, असे काही असुविधा भोगाव्या लागतात का? तर हो ते त्यांना भोगावे लागतात.

कारण गेले १० वर्षांपूर्वी जी पाणी पुरवठा लाईन होती ती आजही तेवढीच आहे. हो पण १० वर्षात लाखो च्या संख्येने या ठिकाणी बाहेरून लोक येऊन वसले तसेच वीज समस्या सुद्धा असाच म्हणावा लागेल तेही वाढवण्यात नाही आले.

नागरिकांना समस्यांचे आगार म्हणून घणसोलीतील सेक्टर-२१चा परिसर ओळखला जातो. डेव्हलपमेंट चार्जेस वेगळे आकारून लाखो रुपये प्रति चौमीने इथल्या भूखंडांची विक्री करून सिडकोने बराच पैसा कमविला. प्रॉपर्टी टॅक्सच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची वसुली करून महापालिकेने आपली तिजोरी भरून घेतली. मात्र, या दोन्ही शासकीय प्राधिकरणांनी या ठिकाणी नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे कुठल्याही प्रकारचे नियोजन नसलेला घणसोली नोड असुविधांचा बाजार झाला आहे.

याशिवाय रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा साचून येणाऱ्या दुर्गंधीमुळे तसेच मलनिःसारणाचे पाणी रस्त्यांवर साचू लागल्याने सेक्टर-२१ परिसराचा उकिरडा झाला आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना नाक मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. तसेच घाणीच्या साम्राज्यामुळे डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भाव वाढून इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

विजेची समस्या
मलनिःसारण वाहिन्यांची वानवा, अपुरा पाणीपुरवठा, पथदिव्यांची कमतरता, रस्त्यांची दुर्दशा, कचऱ्याची दुर्गंधी आदी समस्यांमुळे त्रस्त असलेल्या घणसोली सेक्टर-२१,घणसोली गाव, समर्थ नगर, अर्जुन वाडी, गुणाली तलाव असे अनेक ठिकाण मधील नागरिकांना विजेच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. घणसोलीतील इतर सेक्टरना कोपरखैरणे सबस्टेशनमधून वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र घणसोली मध्ये काही भागातील रहिवाशांना करण्यात येणारा वीजपुरवठा कळवा सबस्टेशनवरून करण्यात येतो. परिणामी कळवा ते घणसोलीदरम्यान असलेल्या विद्युत केबलवर दिघा, चिंचपाडा, ऐरोली, नौसिल नाका, गोठिवली, घणसोली आदी परिसरातील वीजपुरवठेचा भारही पडत असल्यामुळे घणसोलीकरांना सतत विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागते. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत तसेच आजूबाजूच्या वसाहतीकरिता स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य महावितरणकडे करण्यात आलेली असून त्याबाबत अजून काहीही योग्य कार्यवाही महावितरण कडून करण्यात आली नाही.

महापालिका आयुक्त यांना पाणी समस्या सुद्धा अनेक लोकप्रतिनिधी आणि घणसोली गावातील गावकी अध्यक्ष शिवराज रतन मढवी यांनी केलेल्या तक्रारी मध्ये महापालिका अजून काना डोळा करत असताना दिसते.

नवी मुंबई महानगर पालिका आणि सिडको प्रशासन व महावितरण विभागाचे दुर्दैव आहे त्यांना या सगळ्या समस्या माहीत असून ते दुर्लक्ष करून स्वतःची व नवी मुंबईतील नागरिकांनच्या मोठया प्रमाणात अपमान करत असून त्यांच्याकडून कर वसुली करून त्यांना धोका सुद्धा देताना दिसत आहेत.

Related posts

नवी मुंबई महानगरपालिकेचे काही माजी प्रतिनिधींची चालते मनमानी

jantechasavdhanmaharashtra

*शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड*

डॉ एच व्ही सामंत विद्यालय तुर्भे येथे! रेल्वे जागरूकता अभियान!

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment