Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

वॉर्ड क्र 100 आर.आर.पाटील उद्द्यानाची म.न.पा अधिकारी यांनी केली पाहणी…

*आर.आर.पाटील उद्द्यानाची मनपा अधिकारी यांनी केली पाहणी…*

नवी मुंबई मधील नेरूळ येथिल  मा सभागृह नेते रवींद्र इथापे हे त्यांच्या कार्यातून नेहमीच चर्चेत असतात कोणाचाही कार्यक्रम असो ते नेहमीच अग्रेसर असतात, मग ते ग्रामीण भागापासून ते नवी मुंबई पर्यंत व मुंबई या विभागातही त्यांचं अस्तित्व त्यांनी आपल्या कार्यातून टिकून ठेवलेला आहे ते नाईक कुटुंबियांच्या एकदम जवळचे समजले जाणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे, अनेक वेळा त्यांनी आपल्या कार्यामधून महापालिकेत महासभेमध्ये समाज हितासाठी कडक भूमिका घेताना दिसले आणि त्यांच्या या कार्याचे कौतुक करत गणेश नाईक यांनी त्यांच्यावरती सभागृहनेते पदाची जबाबदारी दिली व त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यशैलीतून सर्व पक्षांना बरोबर घेऊन संपूर्ण नवी मुंबईमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत त्यांचं नाव चर्चेत राहिले आणि योगायोगाने त्यांना वार्ड क्रमांक 100 मिळालेला आहे ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे, त्यांच्या वार्डमध्ये हाय क्लास असणारे नागरिक राहत असून या नागरिकांच्या सुख सुविधांसाठी ते नेहमीच महापालिकेमध्ये कडक  भूमिका मांडत असतात, आणि आपला वॉर्डचा विकास खरोखर चांगल्या रीतीने त्यांनी केलेला आहे वार्डमधील नागरिकांनी कुठल्याही समस्या त्यांच्याकडे घेऊन गेल्यास ताबडतोब त्यावर ॲक्शन घेत कामाचा पाठपुरावा करून ते काम पूर्ण करण्याचं ध्येय त्यांनी नेहमीच ठेवला आहे या अनुषंगाने
नेरूळ सेक्टर १९ ए मधील कै.आर.आर.पाटील उद्द्यान सन २०१५ ला नगरसेवक श्री.रविंद्र इथापे यांच्या प्रयत्नातून सुरु करण्यात आले. त्यानंतर तेथे कोणतेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार मा.सभागृह नेते तथा स्थानिक नगरसेवक श्री.रविंद्र इथापे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत उद्द्यानाची पाहणी केली व तेथे बर्‍याच सुधारणा सुचविल्या. त्यामध्ये ओपन जिमची सुधारणा,गजेबोची सुधारणा,लाॅनची दुरुस्ती,विवीध प्रकारची विद्युत अम्ब्रेला,कोकोनट ट्री,सेल्फीसाठी मुन, डक,डिअर,फ्लॉवर, हि उपकरणे बसविणे. तसेच वाॅकवेची व टाॅयलेटची दुरुस्ती करण्याचे श्री.रविंद्र इथापे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचविले व दोन महिन्यात कामे पूर्ण झाल पाहिजेत असे सांगितले. यावेळेस उपअभियंता श्री मोरस्कर,कनिष्ठ अभियंता श्री संदीप ठाकुर हे उपस्थित होते…..

Related posts

शासकीय योजनांमध्ये पत्रकारांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार..

jantechasavdhanmaharashtra

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वयाने काम करणार प्रमोद डोईफोडे आणि वसंत मुंडे यांचा निर्णय

jantechasavdhanmaharashtra

कोपरखैरणे येथे वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी कचरा व घंटागाडी चालकांना मार्गदर्शन! सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment