Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

राज ठाकरे यांनी टोल मुक्त आंदोलन केले ते योग्य होते का अयोग्य ?

 

सहसंपादक अरुण बिराजदार

*राज ठाकरे यांनी टोल मुक्त आंदोलन केले ते योग्य होते का अयोग्य ?*

महाराष्ट्र राज्यात अनेक वेळा निवडणूक लागण्याधी सर्व राजकिय लोकांच्या भाषणात टोल मुक्त महाराष्ट्र असे व्यक्तव्य ऐकायला भेटतात त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांनी एकदा परत “लाव रे तो व्हिडिओ” पत्रकार परिषदेत दाखवला आता इथे राज ठाकरे यांनी योग्य भूमिका घेतली आहे किंवा होती अस आपण गृहित धरू पण पुढे काय झाले.

जेव्हा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना असे सांगितले शिंदे यांनी सुद्धा टोल मुक्त या साठी कोर्टात याचिका दाखल केली होती आता ते स्वतः मुख्यमंत्री आहेत मग का ते टोल मुक्त महाराष्ट्र करत नाही हा प्रश्न राज ठाकरे यांचा योग्य होत! तसेच उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची चार चाकी वाहन यांना पूर्वी पासून आम्ही टोल वर सूट देत आहोत असे सांगतानाचे जेव्हा व्हिडिओ समोर आले तेव्हा राज ठाकरे यांची भूमिका कठोर झाली कारण मनसेचे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री यांचे वडिओ दाखवत टोल नाके तोडफोड करायला निघाले ठाकरे यांनी स्वतः पत्रकरांसमोर हे वाक्य वापरले उपमुख्यमंत्री यांनी सांगितले प्रमाणे कोणीही टोल भरू नये आणि टोल वसुली जर जबरन होत असेल तर आम्ही टोल बूथ जाळून टाकू इथे ही राज ठाकरे योग्य होते!

आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटण्यापूर्वी राज ठाकरे जनतेसाठी योग्य होते हे खरं पण त्यांना भेटल्यानंतर जेव्हा ते पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्यांची झालेली बैठक संदर्भात सांगत होते त्यात त्यांनी नागरिकांनच्या हितासाठी काही विशेष असे सांगताना दिसले नाही त्यावेळेस ते असे बोले टोल हे महाराष्ट्रातील आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे साधन आहे जे पूर्णपणे मुक्त करण्यासाठी आमचे आंदोलन नव्हते ते फक्त टोलवसुली केल्यानंतर नागरिकांना योग्य सुविधा मिळते की नाही यावर आमचा विषय होता हे उत्तर जनतेला राज ठाकरे यांच्या कडून अपेक्षित नव्हते इथे राज ठाकरे यांनी अयोग्य भूमिका घेतलेली दिसत आहे.

जेव्हा उपमुख्यमंत्री यांचे व्हिडीओ वर त्यांची जे भूमिका लोकांसमोर आक्रमक होती ते भेटल्यानंतर कुठे तरी बदलली. एक जबाबदार पदावर एक जबाबदार व्यक्ती जेव्हा बसून असे वक्तव्य करतात तेव्हा ते जुमले असले तर राज ठाकरे यांनी ते समोर आणावे अशी अनेक लोकांना अपेक्षित होते परंतु तसे काही दिसले नाही या ठिकाणी सुद्धा राज ठाकरे यांनी अयोग्य भूमिका घेतले आहे !

आता मुख्य मुद्दा येतो अविनाश जाधव यांच्या ज्यामुळे हे सगळं समोर आले तेच पत्रकार परिषदेत कुठे बोलताना दिसले नाही त्यांची भूमिका स्पष्ट होती ती म्हणजे जे टोल ची संपुर्ण वसूली झाली आहे ते त्वरित बंद करावे आणि बाकी टोल बूथ वर पण किती वसुली बाकी आहे व ते पण कधी बंद होतील ते सांगावे पण राज ठाकरे यांनी यावर सुद्धा बोलताना सविस्तर माहिती किंवा उत्तर नाही दिले.

म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जनतेला असा प्रश्न पडला आहे नकी कोणते राजकीय नेते व पक्ष चांगले राहिले जे खरच जनतेच्या हितासाठी निर्णय घेतात त्यांना योग्य न्याय देतात.

Related posts

प्र.संघटक संजय भोकरे यांचा वाढदिवस म रा पत्रकार संघ नवी मुंबई च्या वतीने सामाजिक बंधीलकीतून साजरा

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नातून ठाणे रेल्वे स्थानकातील कोपरी पूर्वेस दोन नवीन सरकते जिने यांचा लोकार्पण सोहळा संपन्न

jantechasavdhanmaharashtra

*नवी मुंबईतील प्रसिद्ध मनमोहन मिठाईवाला दुकानाच्या मालकाकडून मागितली खंडणी……*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment