कोपरखैरणे (प्रतिनिधी):-
कोपरखैरणे विभागामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा तुटवडा आहे. पाण्यामुळे नागरिक हैराण झालेले आहे. अनेक वेळा नागरिक स्थानिक माजी नगरसेवक व समाजसेवक यांच्याकडे तक्रार करू नही पाण्याच्या समस्या सुटल्या नाही कधी सकाळी कमी दाबाने पाणी येते, तर कधी संध्याकाळी कमी दाबाने पाणी येते,तर कधी पाणी येतच नाही पाण्याचा वेळही नियमित वेळेत नसल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. पण सांगणार कोणाला ?? पालिकेमध्ये जावा तर पाणी सोडणारे कर्मचारी बोलतात ”वरुन आलेले पाणी आम्ही पाठवतो जे आहे तेच पाणी आम्ही तुम्हाला पाठवतो” मग आमचा प्रश्न सोडणार तरी कोण ??पाण्यामुळे अनेक भाडोत्री रुमा ही सोडून जायला लागलेत ज्या लोकांचे रूम भाडे वरती आपले कुटुंब चाललेले आहे अशा लोकांना खूप मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्यापासून चाललेला आहे त्याच रूम मध्ये पाणी जर नसेल तर कसा उदरनिर्वाह चालायचा?? असा प्रश्नही अनेक नागरिकांना पडला आणि स्वतः राहणारे रूम मालक ही पाणी कमी येते म्हणून अनेक वेळा पाणी बाहेरून मागवावे लागत आहे .या आर्थिक मंदीमुळे व कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांना खूप मोठ्या आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. अनेक वेळा नागरिक स्थानिक प्रतिनिधींच्या ऑफिस समोर पाण्याच्या समस्या घेऊन जातात. अनेक वेळा तर हांडेही घेऊन येऊ आणि तुमच्या ऑफिसमध्ये बसू ! असे आव्हानही अनेक नागरिकांनी प्रतिनिधींना केलेले आहे या समस्या वारंवार होत असल्यामुळे संतप्त झालेले प्रतिनिधी व समाजसेवक यांनी महापालिका वार्ड ऑफिस कोपरखैरणे येथे पाणी विभाग अधिकाऱ्यांची आक्रमक चर्चा करून त्यांची चांगलीच कान उघाडणी केली!! पत्रकारांशी बोलताना भाजप माजी नगरसेवक व समाजसेवकांनी सांगितले की येत्या काही दिवसांमध्ये अधिकाऱ्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा आश्वासन दिलेले आहे जर ते पूर्ण नाही झाले तर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही वेळ पडल्यास नागरिकां समवेत मोर्चाही काढण्याची तयारी ठेऊ असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी पालिके मध्ये उपस्थित भाजपचे माजी नगरसेवक केशव म्हात्रे, माजी पाणी सभापती शंकर मोरे, माजी नगरसेविका- भारतीताई पाटील, समाजसेवक- संदीप म्हात्रे, नारायण शिंदे, शिरीष पाटील, शरद पाटील, मारुती सपकाळ, नितीन हिंगे, व अनेक कार्यकर्ते यांच्या उपस्थित निवेदन दिले व कोपरखैराने पाणी पुरवठा विभाग अधिकारी राऊत यांनी येत्या दोन दिवसांमध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.


