Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगाराला वाशी पोलिसांनी केली अटक!

 

तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगाराला वाशी पोलिसांनी केली अटक!
लाखो किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत !

नवी मुंबई प्रतिनिधी:-सुनिल गायकवाड

नवी मुंबई वाशी मुंबई उपनगरे रायगड या भागातून तडीपार केलेल्या अटल गुन्हेगारास वाशी पोलिसांनी अटक केली आहे या आरोपीचे नाव रोशन रामचंद्र कोकरे उर्फ पांग्या वय वर्ष (२४) राहणार जुहूगाव असे असून त्याला नवी मुंबई व इतर जिल्ह्यातील ठिकाणावर हद्दपार करण्यात आले होते मात्र हा सराईत गुन्हेगार वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असल्याचे गोपनीय माहिती विशेष पथकातील पोलीस कर्मचारी चिकणे यांना गोपनीय बातमीदाराच्या आधारे मिळाली असता त्यांनी सदरच्या गुन्हेगाराची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन नांद्रे यांना दिली

वाशी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर भटे, पोलीस निरीक्षक श्री. संजय नाळे. यांच्या मार्गदर्शनाखाली
पवन नांद्रे व त्यांच्या पथकाने अत्यंत शीताफिने सापळा रचून या आरोपीच्या मुस्क्या आवळण्यास यश प्राप्त केले आहे
दरम्यान या आरोपी विरोधात घरफोडी मंदिरातील चोरी मोटर सायकल चोरी मोबाईल चोरी अशा स्वरूपाचे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून या आरोपीला नवी मुंबई मुंबई उपनगरे रायगड या भागातून हद्दपार करण्यात आले होते. या आरोपीकडून २० हजार रुपये किमतीचा गुगल पिक्सल १५ हजार रुपये किमतीचा विवो वाय १९ मॉडल चा मोबाईल ३ लाख दहा हजार किमतीचे विवो कंपनीचे १९ मोबाईल वाशी पोलिसांनी हस्तगत केले आहेत 

सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. मिलींद भारंबे, मा. पोलीस सह. आयुक्त, संजय येनपुरे, मा. पो.उप आयुक्त परिमंडळ – १, वाशी, नवी मुंबई श्री. पंकज डहाणे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. योगेश गावडे यांच्या मार्गदर्शना खाली वाशी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर भटे, पोलीस निरीक्षक श्री. संजय नाळे. (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक पवन नांद्रे, पोहवा-विनोद वारींगे, पोहवा-सुनिल चिकणे, पो. नाईक- दिलीप ठाकुर, पोलीस शिपाई- गोकुळ ठाकरे, केशव डगळे यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.

Related posts

साताऱ्याचा उमेदवार ठरला; राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांची यादी

jantechasavdhanmaharashtra

कोपरखैरणे पोलिसांची जलद कारवाई : मोबाईल स्नॅचिंग प्रकरणातील सराईत गुन्हेगारास अटक; २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

jantechasavdhanmaharashtra

म.रा.मराठी पत्रकार संघ सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांना दिल्ली येथील कार्यक्रमात डॉक्टरेट पदवी बहाल

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment