Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

कोपरखैरणे पोलिसांची पुन्हा एकदा मोठी कारवाई!160 लिटर गावठी दारू जप्त..

कोपरखैरणे (प्रतिनिधी) :
*कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी रुजू होताच गांजा, एमडी, ग्राउंड शुगर अशा अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली.आणि आता तर पथकाने सिंघम स्टाईलने पाटला करून 160 लिटर गावठी दारू जप्त केली*
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या नशा मुक्त नवी मुंबई या अभियाना अंतर्गत कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्याची धुरा हाती घेताच. त्यांनी त्यांच्या टीम सोबत बेकायदेशीर नशा युक्त पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांचा फास आवळायला सुरुवात केली आहे. कोपरखैरणे पोलीस स्टेशन येथे रुजू झाल्यावरती त्यांनी पंधरा ते वीस दिवसात गांजा, एमडी, ग्राउंड शुगर अशा अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली. यानंतर त्यांनी कोपरखैरणे परिसरामध्ये गावठी दारू विक्रेत्यांवर ट्रॅप लावून बोनकोडे गावातून फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करत तब्बल १६० लिटर गावठी दारू जप्त केली आहे.

बोणकोडे खैरणे येथे गावठी दारू विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यावर सदर ठिकाणी ट्रॅप लावला असता तेथे स्विफ्ट कार क्रं एम एच ०६ ए एस ४६४४ या गाडीत मध्ये १६० लिटर गावठी दारू मिळाली गाडी चालकाला गाडीसह ताब्यात घेतले आहे, यात गावठी दारू व चारचाकी असा एकूण २ लाख १६ हजरांचा मुद्देमाल जप्त करून गाडीचालक रणजीत जयवंत देवकर राहणार मोठा देसाई गाव, शिळफाटा जवळ, ठाणे याच्यावर कलम १८६, मोटार वाहन अधिनियम कलम १८४ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रणामे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरखैरणे पोलीस टीम करत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी कोपरखैरणे येथील नशा मुक्ती विरोधात कारवाई तर केलीच पण गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांच धाबे दणाणले आहेत कोपरखैरणे विभागातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की असे सिंघम चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकार आहेत पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष हे काम फिल्मी स्टाईलने सत्यात उतरवले आहे आणि कोपरखैरण्यातील गुन्हेगारीला आळा बसवण्याचे काम या अधिकाऱ्यांच्या मार्फत पोलीस डिपारमेंटने केले असून खरोखर कौतुकास्पद कामगिरी कोपरखैरणे पोलिसांची या पंधरा दिवसांमध्ये पाहिला मिळालेली आहे कोपरखैरन्यातील नागरिक गुन्हेगारी कमी झाल्यामुळे आनंद व्यक्त करत कोपरखैरणे मध्ये गुन्हेगारी वातावरण शांत झाल्यामुळे पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.

Related posts

*वाशी वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम; नियमभंगावर कडक कारवाई करत रस्ते सुरक्षेला प्राधान्य*

jantechasavdhanmaharashtra

*पनवेलमध्ये डंपरची स्कूल व्हॅन व रिक्षाला धडक;  मुलांसह जखमींची सुखरूप सुटका,*

मा.ई प्रभाग समिती सदस्य डॅा.प्रतिक तांबे यांचा ५० वा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment