*नशामुक्त नवी मुंबईअंतर्गत कोपरखैरणेत व.पो नि औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई*
नवी मुंबई, (कोपरखैरणे) पोलिस विभागाच्या नवी मुंबई नशामुक्त मोहिमेअंतर्गत कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी अमली पदार्थ कारवाईविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी कोपरखैरणेचा पदभार स्वीकारताच एका मागून एक कारवाई चालूच आहे,
बालाजी थिएटरजवळील झोपडपट्टीमधून तब्बल २० किलो गांजा पकडून अमली पदार्थ विक्री करणा-यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली . या मोहिमेसाठी नवि मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, परिमंडळ १ चे उपायुक्त पंकज डहाने यांच्या विशेष मार्गदर्शनानंतर ३१ लाख ६० हजारांचे एमडी, ब्राऊन शुगर पदार्थ रहिवासी इमारतीतून जप्त केले होते. त्यानंतर लगेचच रात्रीच्या गस्तीच्या वेळेस गुन्हें प्रकटिकरण कक्षचे सागर टकले यांनी ४ लाख ५०
हजारांची ब्राऊन शुगर जप्त केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ
कोपरखैरणे विभागात आढळून आल्याने औदुंबर पाटील यांनी या गुन्ह्यांच्या मुळावरच घाव घालून बालाजी थिएटर जवळील झोपड्या हटवण्याची मागणी केली होती.नवी मुंबई महापालिका प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस प्रशासनासोबत कारवाई करत सदर झोपड्या तोडल्या आहेत. या कारवाईसाठी २०० पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे विभागाचे ४० अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते
या आधी या झोपड्यांवर कारवाईदरम्यान पोलिसांवर हल्ला झाला होता.
कारवाई कोपरखैरणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी-कर्मचारी, अमली पदार्थविरोधी पथक, नवी मुंबई महानगरपालिका कोपरखैरणेचे विभाग अधिकारी सुनील काठोळे, अतिक्रमण विभाग सचिन नामवाड, वरिष्ठ लिपिक राकेश ममेकर, प्रवीन जाधन, कमलाकर पाटील, समाधान चाळके यांच्यासह महापालिका अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक यांनी अथक प्रयत्न करून मोहीम राबविण्यात आली
या सर्व कारवाई मुळे कोपरखैरणे पोलीस यांचा वरचा विश्वास आणि त्यांनी केलेल्या कारवाई बद्दल चे स्वागत व आभार कोपरखैरणे नागरिकांनी केले आहे
*सुमारे १४ किलो ५००ग्रॅम गांजा जप्त*
*अतिक्रमण कारवाईदरम्यान झोपडाच्या खालील गटारात सुमारे
*आरोपी नावे
★अटक पोपट कल्याण शिंदे वय 45 वर्ष. रा. सेक्टर 9 कोपरखैरणे, बालाजी थेटर जवळील झोपडपट्टी याच्याकडून
एकूण जप्त मुद्देमाल
* *14 किलो 500* ग्रॅम वजनाचा गांजा 2,90,000/-रुपये* व 3,00,000/-रू किमतीचा दोन ऑटो रिक्षा जप्त असे *एकूण रु.5,90000* किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
गुन्ह्यातील फरार आरोपी 1) दशरथ बापूराव शिंदे, 2) संतोष दत्ता शिंदे, 3) संजनाबाई बलभीम शिंदे यांचा शोध सुरू आहे.
*पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त पंकज इहाणे यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आली असून असा कारवाया यापुढेदेखील सुरु राहणार आहेत. नागरिकांना कुठे असे काही आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास आणून पोलिसांना सहकार्य करावे*
.
*औदुंबर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरखैरणे पोलीस ठाणे*

