Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजशहर

आळेफाटा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

*आळेफाटा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

पुणे(आळेफाटा प्रतिनिधी)
आळेफाटा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांची नियुक्ती झाल्यानंतर जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचे संपादक राजेंद्र बोडके यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व आळेफाटा विभागातील समस्या बद्दल विचारले असता त्यांनी माहिती देताना सांगितले की आळेफाटा विभागामधील अनाधिकृत पणे चाललेले व्यवसाय चोरी घरफोडी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सर्वच गुन्हेगारांवर अंकुश ठेवून गुन्हेगारीला आळा घालण्याचा काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस हे नागरिकांचे मित्रच असतात नागरिकांनीही जागृत राहून पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे आजूबाजूच्या विभागांमध्ये काही चुकीचा गुन्हा घडत असेल तर नागरिकांची ही नैतिक जबाबदारी आहे पोलिसांना कळविने, पोलीस हे नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात आळेफाटा विभागात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम तत्पर असणार आहे आळेफाटा विभागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेक गुन्हेगारांना चाप बसणार अशी चर्चा आळेफाटा विभागात चालली आहे.

Related posts

ऑनलाईन साईटच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय करणारे तीन आरोपी पश्चिम बंगाल येथून अटकेत

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील नववीपर्यंतच्या शाळा बंद,

jantechasavdhanmaharashtra

2022:नवी मुंबई महापालिकेतील आरक्षण सोडत जाहीर! 50% जागा महिलांसाठी आरक्षित

Leave a Comment