Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*प्रतिक्षा संपली! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली समोर, उद्या शपथविधी होणार*

मुंबई (प्रतिनिधी)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
उद्या (15 डिसेंबर) भाजपचे 21, शिवसेनेचे 12 राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 किंवा 4 वाजता शपथविधी होईल.

उद्या राज्यमंत्री मंडळाचा विस्तार नागपुरात होणार आहे. याआधी 1991 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात झाला होता. 1991 ला ज्यावेळी शिवसेना फुटली, त्यानंतर छगन भुजबळ गटाने बंड करत काँग्रेस सोबत शपथ घेतली. 33 वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet expansion) कार्यक्रम हा नागपुरात होणार आहे. याचदरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी (Maharashtra Cabinet Minister List) समोर आली आहे.

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

1. देवेंद्र फडणवीस
2. गिरीश महाजन
3. रविंद्र चव्हाण
4. मंगलप्रभात लोढा
5. चंद्रशेखर बावनकुळे
6. आशिष शेलार
7. नितेश राणे
8. शिवेंद्रसिंहराजे भोसले
9. राहुल कुल
10. माधुरी मिसाळ
11. संजय कुटे
12. राधाकृष्ण विखे पाटील
13. गणेश नाईक
14. पंकजा मुंडे
15. गोपीचंद पडळकर

शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-

1. एकनाथ शिंदे
2. उदय सामंत
3. शंभूराजे देसाई
4. गुलाबराव पाटील
5. दादा भुसे
6. प्रताप सरनाईक
7. संजय शिरसाठ
8. भरत गोगावले
9. आशिष जयस्वाल
10. योगेश कदम
11. विजय शिवतारे
12. आबिटकर किंवा यड्रावकर

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

1 अजित पवार
2. छगन भुजबळ
3. आदिती तटकरे
4. अनिल पाटील
5. संजय बनसोडे
6. मकरंद पाटील
7. नरहरी झिरवाळ
8. धनंजय मुंडे

राज्यमंत्री-

1. सना मलिक
2. इंद्रनील नाईक

आश्वसनं दिली, ती पूर्ण करु- देवेंद्र फडणवीस

राज्याला स्थिर सरकार मिळावं अशी जनतेची अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार आहोत, 2100 देखील देणार आहोत, बजेटच्या वेळी त्याचा विचार करु, आर्थिक सोर्सेस योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतर ते करता येतं. जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करु, निकषात असतील त्यांना लाभ मिळेल, निकषाच्या बाहेरच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पूनर्विचार करु, मात्र सरसकट पूनर्विचार करणार नाही, असं देवेंद्र फडवणीस म्हणाले.

Shiv Sena : शिवसेनेला 9 कॅबिनेट, 3 राज्यमंत्रिपद मिळणार,संभाव्य मंत्र्यांची यादी ‘जनतेचा सावधान महाराष्ट्र वर

Related posts

नावि मुंबई मधे कोपरखैरणे पोलिसांची मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

jantechasavdhanmaharashtra

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई ! वाहतुकीचे नियम मोडनारांवर होणार कडक कारवाई!*

jantechasavdhanmaharashtra

नामदार श्री बाळासाहेब थोरात  महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार डॉ श्री सुधीरजी तांबे  यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे गटनेते श्री अजय भाऊ फटांगरे  यांच्या पुढाकाराने आज बोटा कोविड सेंटर पुन्हा चालू करण्यात आले

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment