Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*मुंबई हादरली! 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; दादर रेल्वे स्थानकात…*

*मुंबई हादरली! 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; दादर रेल्वे स्थानकात…*

मुंबई:-प्रतिनिधी

राज्यात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कराची घटना ताजी असतानाच अत्याचाराचे सत्र महाराष्ट्रात सुरु आहे.
स्वारगेट येथे शिवशाही बसमधील तरुणीवर अत्याचारानंतर आता मुंबईत बलात्काराची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका बारा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. मुलीलाला एकट बघून हे नराधम मुलीला त्यांच्या संजय नगर जोगेश्वरी येथील घरी घेऊन गेले आणि त्यानंतर या नराधमांनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला.
या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपी एसी मेकॅनिक असल्याची माहिती आहे. सुदैवाने अल्पवयीन मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना पोलिसांना संशय आला. त्यांनी तिची विचारपूस केली असता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर येताच त्यांनी लगेच जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क केला असता तरुणीचा अपहरण झालं असल्याची तक्रार आल्याचं त्यांनी सांगितलं. मुलीच्या जबाबानंतर गुन्ह्यात सामूहिक बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्स) कायदा अंतर्गत कलमाची वाढ करून पाचही नराधमांना अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलगी 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता

पीडित मुलगी काही दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर ती दादर रेल्वे स्थानकावर सापडली. तिच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत. पीडित मुलगी जोगेश्वरीत नातेवाईकाबरोबर राहत होती. 24 फेब्रुवारी रोजी ती बेपत्ता झाली होती. 27 फेब्रुवारीला पीडित मुलगी रेल्वे पोलिसांना दादर स्थानकात सापडली. रेल्वे पोलिसांनी तिला जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या चौकशीत तिच्यावर जोगेश्वरी परिसरात लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

Related posts

समाजसेवक निलेश कचरे यांच्या पाठपुराव्याला यश; सानपाड्यात पोलीस चौकी पुन्हा सुरू,

महाराष्ट्रातील 8 अग्निशमन अधिका-यांना अग्निशमनशौर्यपदक जाहीर

jantechasavdhanmaharashtra

पारिजात को-ऑफ.क्रेडिट सोसायटी लि.चे 25 वी वार्षिक सर्वसाधर सभा सम्पन्न

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment