Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*सरपंचांची पाठ फोडली, कातडी सोलली, मारून मारून पाईपचे 15 तुकडे, सुदर्शन-प्रतिकने दिल्या नरकयातना*

*सरपंचांची पाठ फोडली, कातडी सोलली, मारून मारून पाईपचे 15 तुकडे, सुदर्शन-प्रतिकने दिल्या नरकयातना*

 

बीड:-प्रतिनिधी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगकडून अमानुष मारहाण करण्यात आली. अंगावरील कपडे काढून झालेल्या या मारहाणीचे फोटो सीआयडीच्या चार्जशीटमधून समोर आले आहेत.हे फोटो पाहून कोणाचंही काळीज पिळवटून जाईल असे हे फोटो आहेत.
हत्या करणाऱ्यांनी अमानुषतेचा कळस कसा गाठला आणि देशमुख यांची कशी हालहाल करून हत्या केली याचा फोटोनंतर आणखी सर्वात मोठा पुरावा समोर आलाय. संतोष देशमुख यांना केवळ अंतर्वस्त्रावर बसवलं आणि पाईपचे 15 तुकडे पडेपर्यंत मारण्यात आलं आहे. पाईपच्या तुकड्यावरून ही मारहाण किती क्रूरपणे झाली याचा अंदाज येत आहे.

संतोष देशमुख यांच्या अंगावरील, पाठीवरील व्रण देखील स्पष्ट दिसत आहे. अर्धमेल्या अवस्थेतील संतोष देशमुख यांना बसवून ठेवून आरोपींनी त्यांच्यासोबत सेल्फी काढलेले व्हिडिओ काढत असलेले दिसून येत आहेत. त्यावरुन आरोपींनी राक्षसी कृत्य केल्याचं आता पुराव्यानिशी उघड झालंय. मारहाणीनंतर आरोपींनी संतोष देशमुख यांच्यासमवेत फोटो काढला असून त्यात त्यांचं आसुरी हास्य दिसून येतेय. जयराम चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले या फोटोंमध्ये दिसून येत आहेत.

सीआयडीच्या हाती पाईपचा मोठा पुरावा

संतोष देशमुखांना मारहाण करताना पाईपचा वापर केला होता. प्रतीक आणि सुदर्शन घुलेने संतोष देशमुखांना मारहाण करताना पाईपचा वापर केला होता. अत्यंत अमानुषणे आणि क्रूरपणे ही मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण इतकी भीषण होती की, त्या पाऊपचे एक, दोन नाही तर तब्बल 15 तुकडे पाडले गेले. घटनास्थळावरून हे पाईपचे तुकडे सीआयडीने गोळा केले असून पुरावा म्हणून याचे तुकड्यांचा फोटो चार्जशीटमध्ये पुरावा म्हणून जोडला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं धक्कादायक वास्तव दोषारोपपत्रातून समोर आलंय. संतोष देशमुख यांना मारताना आरोपींनी काढलेल्या व्हिडिओमधील काही फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. यापार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. आरोपींच्या राक्षसी कृत्यामुळे समाज माध्यमावर प्रचंड रोष व्यक्त केला जातोय. पोलीस प्रशासनाने शांततेचं आवाहन केलं असली तरी लोकांमध्ये चीड आहे. त्यामुळे बीड बंदच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Related posts

*पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती*

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत वीज कामगारांची सकारत्मक चर्चा! संप माघे

jantechasavdhanmaharashtra

*जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचा ५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment