Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*कोपरखैरणेतील महिलेचा खून; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल*

*नवी मुंबई | प्रतिनिधी*

कोपरखैरणे सेक्टर १९ येथील जय आंबे इमारतीत राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेचा तिच्या पतीनेच खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (११ जून २०२५) दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी आरोपी गणेश मारुती शिरसाट (वय ३८) याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

मयत महिलेचे नाव गौरी गणेश शिरसाट असून त्या नर्स म्हणून कार्यरत होत्या. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास, अज्ञात कारणावरून पती गणेश शिरसाट याने पत्नी गौरीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

घटनेनंतर घटनास्थळी कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक दाखल झाले. फॉरेन्सिक व्हॅनच्या सहाय्याने आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 

या प्रकरणी फिर्याद गौरी शिरसाट यांची सखी वैशाली सतिश पाटील (वय ४०) यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दिली असून, गुन्हा क्र. ५८०/२०२५ अंतर्गत बी.एन.एस. कायदा कलम १०३ व भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधंवत व वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून  तपास अधिकारी  सपोनि  प्रदिप दुपटे आणि पोलीस उपनिरीक्षक वैभव नवले  आणि इतर अधिकारी यांच्याकडून घटनेचा सर्वांगीण तपास सुरू आहे.

Related posts

मा.ई प्रभाग समिती सदस्य डॅा.प्रतिक तांबे यांचा ५० वा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

jantechasavdhanmaharashtra

*रबाळे पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

jantechasavdhanmaharashtra

*सानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य उद्घाटन*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment