Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*नवी मुंबई महानगरपालिकेत १० नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती;*

*नवी मुंबई महानगरपालिकेत १० नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती;*

प्रतिनिधी :-जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई महानगरपालिकाच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५(२)(ब) अंतर्गत १० नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. पिठासन अधिकारी तथा महापौर सुजाता पाटील यांनी ही घोषणा करत विविध क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींना प्रशासनात संधी देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगितले.

नियुक्त सदस्यांची क्रमवार यादी पुढीलप्रमाणे आहे
१) कुलदीप सुरी
२) भरत नखाते
३) जगजीवन केणी
४) अपर्णा गवते
५) अमित मेढकर
६) लक्ष्मीकांत पाटील
७) द्वारकानाथ भोईर
८) साहिल चौगुले
९) सुरेश भिलारे
१०) अंकुश कदम

या सदस्यांचा सामाजिक, व्यावसायिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनुभव महानगरपालिकेच्या धोरणात्मक निर्णयप्रक्रियेला दिशा देणार असून स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला अधिक सक्षम पाठबळ मिळेल, अशी प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त झाली.

नियुक्त सदस्यांचे महापौर सुजाता सूरज पाटील उपमहापौर दशरथ भगत तसेच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञ यांचा समन्वय वाढल्यास शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related posts

नवी मुंबई महानगरपालिकेचे काही माजी प्रतिनिधींची चालते मनमानी

jantechasavdhanmaharashtra

लालबाग राजा’च्या दरबारात पोलिसांची मुजोरी, एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना धक्काबुक्की

jantechasavdhanmaharashtra

अपोलो कॅन्सर सेंटरकडून एन्ड-ओ-चेक शिबीराचे आयोजन

Leave a Comment