*न्यू इंग्लिश स्कूल खामुंडी चा SSC परीक्षेत सलग घवघवीत यश, १००% निकालाची परंपरा कायम*
आळेफाटा (प्रतिनिधी )– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC) इ. १० वी परीक्षेचा निकाल शुक्रवार दि. ८ मे रोजी जाहीर झाला. यामध्ये खामुंडी येथील न्यू इंग्लिश स्कूल ने पुन्हा एकदा १००% निकाल लावत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्या मध्ये
प्रथम क्रमांक समृद्धी गणेश शिंगोटे, द्वितीय सार्थक उत्तम गंभीर, तृतीय अलिशान परवेज मोमीन, चौथा कावेरी पुराणिक नलावडे आणी पाचवा क्रमांक रिया रवींद्र शिंदे यांनी पटकावला आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीतही चमकदार कामगिरी केली असून अनेक विद्यार्थी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक बाळू बांगर, शिक्षक सुवर्णा नांगरे,सुनीता वर्पे, राजेंद्र शिंदे, संजय आहेर हे म्हणाले की , “हा निकाल विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचे फलित आहे. शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नेहमीच कटिबद्ध राहिली आहे आणि यापुढेही हा वारसा जपला जाईल.”
या यशाबद्दल संस्थाचालक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. निकालानंतर शाळेत आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. गावकऱ्यांनीही शाळेच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

