Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

अवजड वाहतूक उद्यापासून बंद?; ठाणे-नवी मुंबईतील निर्बंधांचा व्यवसायाला फटका

ठाणे : महाराष्ट्र आणि मुंबईतील महत्त्वाचे साठवणूक केंद्र असलेल्या भिवंडी येथील गोदाम केंद्राच्या दिशेने अवजड मालवाहतूकदारांना दिवसभर ये-जा करण्यास बंदी घालण्यात आल्याने उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून या गोदामांच्या दिशेने आणि पुढे राज्यभर होणारी कोटय़वधी रुपयांच्या मालाच्या आयात-निर्यातीवर मोठा परिणाम होऊ लागला आहे. ठाणे आणि नवी मुंबईत होणारी ही अवजड वाहतूक सुरू करा, अन्यथा गुरुवारपासून रात्रीच्या वेळेत होणारी अवजड वाहतूकही बंद करण्याचा इशारा मालवाहतूकदार संघटनांनी दिला आहे.

यामुळे सरकारी यंत्रणांपुढे पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे खड्डे बुजविण्याची कामेही जवळपास ठप्प झाली असून यामुळे ही डोकेदुखी वाढली आहे.

नवी मुंबई येथील जेएनपीटी बंदरात दिवसाला सुमारे १४ हजार कंटेनरची आयात-निर्यात होते. अवजड वाहनांच्या मदतीने या कंटेनरमधील ६४ टक्के माल हा राज्याबाहेर तर उर्वरित माल हा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांकडे रवाना होत असतो. यापूर्वी ठाणे पट्टय़ात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी होती. खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

त्यामुळे शनिवारी पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी बैठक घेतली. या बैठकीत अवजड वाहनांना ठाणे आयुक्तालय आणि नवी मुंबई शहरात दिवसा बंदी घातली आहे. या निर्णयानुसार रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेतच परवानगी देण्यात आली आहे.

ई-वे बिल रद्द ..केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा करासोबत ई-वे बिल ही प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीअंतर्गत ५० हजार रुपयांहून अधिक मूल्य असलेल्या वस्तूंची वाहतूक राज्यात किंवा राज्याबाहेर करण्यासाठी ई-वे बिल तयार करणे आवश्यक आहे. ई-वे बिल काढल्यापासून २४ तासांच्या आत २०० किमी अंतर पार करणे आवश्यक आहे. हे अंतर पार झाले नाही तर वस्तूवर लावण्यात आलेल्या कराच्या दोनशेपट दंड आकारण्यात येतो. मात्र वेळेच्या र्निबधांमुळे फटका बसत आहे.

वाहतूकदार आक्रमक

* वेळेच्या र्निबधांमुळे जेएनपीटी बंदरापर्यंत माल पोहचणे कठीण ठरते. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता

* रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत या सात तासांमध्ये हजारो कंटेनर एकाच वेळी बाहेर पडतात. त्यामुळे रात्रीही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाहनचालकांना नवी मुंबईतून ठाण्यात येण्यासाठीच सात तास लागत आहे.

अवजड वाहनांना केवळ रात्रीच्या वेळेत परवानगी दिल्यास त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. वाहतुकीचे दर वाढले आहेत. अवजड वाहनांसाठी घेण्यात आलेला निर्णय मागे घ्यावा.

– अभिषेक गुप्ता, व्यवस्थापकीय समिती सदस्य, बाँबे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिशन.

वाहतूक कोंडीला मालवाहतूकदारांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. केवळ सात तास वाहतूक करण्यास परवानगी दिल्याने मालवाहतूक करून उपयोग काय? त्यामुळे गुरुवारपासून आम्ही मालवाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये विविध १० संघटनांचे सुमारे ४ हजार सदस्य सहभागी होण्याची शक्यता आहे.

– प्रवीण पैठणकर, अध्यक्ष, महाराष्ट्र अवजड वाहन आणि आतंररराज्य कंटेनर ऑपरेटर असोसिएशन.

Related posts

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने संपादक अरुण बिराजदार यांना वाढदिवसानिमित्त बोध चिन्हचे घड्याळ देऊन केला सन्मान

jantechasavdhanmaharashtra

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

jantechasavdhanmaharashtra

*आनंदाची बातमी: सिडकोकडून २२ हजार घरांची नवी लॉटरी – सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नांना नवी दिशा*

Leave a Comment