*आयुष्याचे गणित* (भाग – १) *Mathematics of Life*
(Part 1 )
सायंकाळी ८ वाजता *कोणती भाजी करू*? हा प्रश्न जेवढा चुकीचा आहे तेवढंच—–
*२५ व्या वर्षी *MPSC / UPSC* च्या तयारीला लागणे,
*३० व्या वर्षी* लग्न करणे ,
*४० व्या वर्षी* मुले जन्माला घालणे
हे ही चुकीचे आहे.
आज आपण सभोवताली अनेक सामाजिक, शारिररिक, मानसिक असंतुलनाची उदाहणे बघतो. त्याचे एक कारण म्हणजे *योग्य त्या वेळी योग्य त्या गोष्टी न करणे*, असे माझे वैयक्तिक मत आहे आणि आपण माझ्याशी सहमत असावे असा माझा आग्रह पण नाही.
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता ८ वीत असताना *मी कोण होणार* हा निबंध लिहिणे गरजेचे आहे व ती जबाबदरी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकाची आहे. अनेकदा आपण गणित व विज्ञान या विषयांवर ज्यास्त भर देतो, पण भाषा ही तेवढीच महत्वाची आहे. कारण त्याच भाषेत आपण विचार करतो व जसा विचार तसा आचार व कर्म तसे फळ !
साधारणतः २२ / २३ व्या वर्षी शिक्षण पूर्ण होते. (१२+४ / १२ +३ +२ / १२ + ५) व नंतर नोकरी / व्यवसायाला सुरवात होते . त्यानंतर २ वर्षांनी घर घेणे व ४ वर्षांनी लग्न करणे शक्य आहे. पण हा महत्वाचा वेळ अनेक मुले वाया घालवतात व पालकही त्याबद्दल फारशे गंभीर दिसत नाहीत. जे विध्यार्थी आज MPSC / UPSC ची तयारी करत असतील ते सांगतात की, सुरवात ही पहिल्या वर्षयापासूनच केली पाहिजे. जे NET / SET करत असतील, ते सांगतात की पदव्यूत्तर शिक्षणाच्या वेळीच ही परीक्षा दिली पाहिजे . *पुढच्याला ठेच मागचा शहाणा* हे आपल्याला का कळत नाही?
निसर्ग नियमाप्रमाणे, १४ – १६ व्या वर्षी मुलं वयात येतात. वैद्यकीय व सरकारी नियमाप्रमाणे १८व्या व २१व्या वर्षी लग्नासाठी परिपक्व होतात. तरीही शिक्षण, नोकरी, घराचे कारण दाखवून लग्न लांबविले जाते व त्याचे गंभीर परिणाम सभोवताली पाहायला मिळतात. तीशीनंतर झालेल्या लग्नांमधे घटस्फोटाचे
प्रमाण अधिक.
वंध्यत्वाचे प्रमाण अधिक.
शारीरिक व मानसिक तणाव अधिक.
– Self Awareness मुळे मतभेद व अपेक्षा अधिक.
आपल्या आजोबा-आजीच्या काळात १८ व्या वर्षी पहिले व दर दोन वर्षांनी एक, असं ३० व्या वर्षी ६-७ मुले नैसर्गिक प्रसुती होऊन, आजी ८० व्या वर्षी देखील काटक रहायची. आजकाल ३० व्या वर्षी पहिले बाळंतपण तेही सिझरिण.एवढा त्रास की, दुसर्याचा विचार करणे नाही, आणि ३५ व्या वर्षी दुसरे झाले तर पोटाचा घेर व कंबरेचे दुखनणे आयुष्यभर कमी होणे नाही.
*त्यामुळे योग्य वयात योग्य गोष्टी झाल्याच पाहिजेत* असे मला वाटते. 🙏
( प्रशांत नेहरकर* )
यात कोणीही दुखविले जाऊ नये पण लोकांना वेळेचे गांभीर्य कळावे हि इच्या. 😊

