Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

जाचकवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागातून साकारली डिजिटल शाळा

 

सतीश फापाळे संगमनेर(प्रतिनिधी)

 

जाचकवाडीत जिल्हा परीषद शाळेचा लोकसहभागातून कायापालट.

अकोले तालुक्यातील शेवटचे टोक ओळख असलेले पठारावरील ग्रामीण भागात सर्वसाधारण १५०० ते १६०० लोकसंख्येचे जाचकवाडी गाव आणि या गावात सर्वात कमी २५ विद्यार्थ्यांसह इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि या शाळेची इमारत इ.स.वी सन १९७१ ते १९७२ रोजी दगडी बांधकामात उभी झालेली कौलारू इमारत आजतागायत जीर्ण होत चालली होती.


जिल्हा परिषद शाळा जाचकवाडी येथे शिक्षक दत्तू रखमाजी गोपाळे आणि शिक्षक राजू भगवंत ढेरंगे यांची २०१८ साली नियुक्ती झाली.आणि या दोन्ही आदर्श शिक्षकांनी या शाळेचा कायापालट करण्याचा संकल्प मनी बाळगला होता .त्यानुसार त्यांनी गावातील तरुणांशी ग्रामस्थांशी चर्चा करून या शाळेची गुणवत्ता वाढवून इंग्रजी माध्यमात मुलांना मिळणाऱ्या सुविधा शिक्षण देण्याचा शिक्षकांनी निर्धार केला.त्यासाठी बाहेरगावी जाणारे विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करून घेत पटसंख्या ४८ वर नेऊन ठेवली.विद्यार्थ्यांची कला,क्रीडा,अभ्यासात गुणवत्ता वाढवली,विद्यार्थ्यानं मधील शिस्त, व्यक्तिमत्त्व विकास पाहून ग्रामस्थ भारावून गेले .यातून ग्रामस्थांचा विश्वास जिंकला.तसेच शाळेचा जीर्णोद्धार करण्याचा विषय ग्रामस्थांनपुढे मांडला.ग्रामस्थांनी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून हवी ती मदत करण्याचे ठरविले.


  • जाचकवाडी गावातील तरुणांनी तसेच ग्रामस्थांनी देखील उस्पूर्त प्रतिसाद देत देणगी स्वरूपात काही रक्कम जमा करण्यास सुरवात केली.या शाळेसाठी जो ग्रामस्थांचा मदतीचा ओघ सुरू झाला त्यातून लोकवर्गणी नऊ लाख वीस हजार रुपये जमा झाले.शाळेतील शिक्षकांनी आणि मुलांनी संस्कृतिक कार्यक्रम सादर केला त्यात अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे यांनी या विद्यार्थ्यांचे कला गुण पाहून तसेच शाळेसाठी ग्रामस्थांची असलेली तळमळ पाहून या शाळेचे चारही बाजूने बंदिस्त संरक्षक भिंती बांधण्यासाठी पंधरा लाख रुपयांचा भरघोस निधी दिला यातून शाळेचे कंपाऊंड काम पूर्ण झाले.

  • लोकवर्गणीतून प्रथमतः शाळेच्या इमारतीचे छत्रावरील जुनी कौले काढून कोटिंग पत्रा शाळेवर टाकला,प्रत्येक वर्गात पंखे बसविले. अक्रोलीक मध्ये शाळेचे भव्य प्रवेशद्वार उभारले,ग्रामस्थांनी एक दशक्रिया एक झाड ,एक वाढदिवस एक झाड या प्रेरणेतून विविध झाडांची लागवड केली,झाडांसाठी जाळी बसवून ड्रिप करण्यात आले,मोठ्या वटवृक्षाला मार्बल मध्ये ओटा बांधला,ध्वजाचे सुसज्ज बांधकाम केले.शाळेच्या सर्व भिंतीवर बाराखडी,पाढे,पशू पक्षांची चित्र रेखाटली.शाळेत सुंदर बगीचा उद्यान तय्यार करण्यात आले.शाळेच्या मैदानात असलेला विद्युत पोल मुलांच्या सुरक्षेसाठी हटविण्यात आला.आज या शाळेत मुलांना खेळण्यासाठी भव्य मैदानासह फुलझाडांचा बगीचा देखील तय्यार करत बगीचेत विविध खेळणी ठेवण्यात आली,मुलांना पाणी पिण्यासाठी फिल्टर बसविण्यात आले,तसेच मुलांना करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यासाठी प्रोजेक्टर बसवून त्यावर विविध माहिती पट विद्यार्थ्यांना दाखविले जात आहे.आज या शाळेत थेट खेळाच्या मैदानातून खेळाडू तय्यार केले जात असून तालुका राज्य पातळीवर खेळन्यासाठीची तय्यारी करून घेतली जात आहे. तर कृतीतून तसेच रुपेरी पडद्यावरून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण दिले जात आहे.
    कोरोना महामारीच्या काळात देखील विद्यार्थ्यांची अभ्यासाची काळजी घेत ग्रामस्थांच्या तसेच पालकांच्या मदतीने शाळा सुरू ठेवत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचे काम आदर्श शिक्षक दत्तू गोपाळे,राजेंद्र ढेरंगे या शिक्षकांनी केले.आणि आज हि शाळा पाहण्यासाठी जिल्ह्यातील विविध शाळेतील शिक्षक ,अधिकारी ह्या डिजिटल जिल्हा परिषद शाळा जाचकवाडीला भेट देत आहे.भेट देणारे पाहुणे शाळा पाहून भारावून जात ग्रामस्थांचे येथील तरुणांचे ,पालकांचे तसेच आदर्श शिक्षकांचे आणि विद्यार्थी मुलांचे कौतुक करत एकच उद्धार काढत आहे. जाचकवाडीची जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळा जिल्ह्यात एक नंबर झाली आहे
  • .

Related posts

*मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न, विठुनामाच्या गजरात पंढरी दुमदुमली*

*पनवेलमध्ये डंपरची स्कूल व्हॅन व रिक्षाला धडक;  मुलांसह जखमींची सुखरूप सुटका,*

शिवनेरी किल्ला येथे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment