Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

अनाधिकृत वाहन पार्किंग, करून रस्ता जाम केल्यास होणार कडक कारवाई !!पोलिस निरीक्षक विमल बिडवे..

नवीमुंबई APMC:- प्रतिनिधी (जितेंद्र चव्हाण)

नवी मुंबई शहरामध्ये वाहतुकीचे प्रश्न दिवसेन दिवस वाढतच चालले असताना, नागरिक व जेष्ठ नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी, नवी मुंबई चे पोलिस आयुक- मिलिंद भारंबे यांनी सुरक्षा सप्ताह दरम्यान नागरिकांना मध्ये जनजागृक्ता व्हावी या अनुषंगाने वाहतूक विभागा मार्फत. उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या ,छोटा पोलिस , नाट्यमय स्वरूपात ,विद्यार्थ्यांना मार्फत,मद्यपान करून गाडी न चालविणे, रफ ड्रायव्हिंग,सिग्नल जम्प, विना हेलमिट गाडी न चालविणे, सीट बेल्ट,अपघात टाळण्यासाठी ,अश्या अनेक गोष्टींची जनजागृती करण्यातआली,व आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईत आल्यापासून नेहमी नागरिकांच्या हितासाठी चांगले निर्णय घेतले आहे नागरिकांचे हित जोपासत वाहतुकी संधरबात नागरिकांना व जेष्ठ नागरिकांना होणार त्रास लक्षात घेता सम्पूर्ण नवी मुंबई मध्ये बस थांबा परिसरामध्ये अनाधिकृत वाहने पार्किंग असल्या कारणामुळे जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी नवी मुंबई परिसरमधील
बस थांबा वरती अनेक वाहने अनाधिकृत पार्किंग केलेली अनेक वेळा आढळण्यात आली त्यामुळे एन एम एम टी व बेस्ट बस साठी नागरिकांना चढण्या उतरण्यासाठी अनेक वेळा अडचण होत होत्या.व बस रस्त्याच्या मध्यभागी थांबवावी लागत असे, त्यामुळे संपूर्ण रस्ता जाम झाल्यामुळे वाहतूक कोंडी होत असे, तरीही वाहनधारक बस थांबाच्या आजूबाजूलाच वाहने पार्किंग करत होते त्यांना कित्येक वेळा समज देऊनही वारंवार वाहने बस थांबाच्या आजूबाजूलाच पार्क करत होते या अनुषंगाने नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व APMC वाहतूक विभागाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांसह APMC विभागातील सर्व बस थांबा वरती व आजूबाजूला असलेले अनाधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यातआली व बस थांबा हा मोकळा करण्यात आला.

त्या बरोबर रिक्षा चालकाने भाडे नाकारणे या संधरबात कारवाई करून APMC हद्दीतील सर्व रिक्षा चालकांना एकत्र करून त्यांच्या मध्ये भाडे नाकारू नये या  संधरबात जनजागृती करण्यात आली व त्यामुळे येणार जाणाऱ्या बस चालक व नागरिक यांनी APMC पोलिस वाहतूक शाखेचे प्रमुख विमल बिडवे व त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले. व विमल बिडवे यांनी वाहनधारकांना आव्हान केले की, वाहतुकीस अडचण होणार नाही, व अनधिकृत पार्किंग करून जनतेला त्रास होणार नाही, अशा ठिकाणी आपण वाहने पार्किंग करावी अन्यथा येथून पुढे ही अशा ठिकाणी वाहणे आढळून आल्यास वाहनांवरती यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल असे आव्हान नागरिकांना करण्यात आले.

Related posts

आळेफाटा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

jantechasavdhanmaharashtra

म्हसवंडी गावात पडला दरोडा!! एकाच वेळी फोडली 7 घरे…*

jantechasavdhanmaharashtra

पत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment