**कोंबिंग व विशेष मोहिमेत कोपरखैरणे पोलीस ठाण्याची प्रभावी कारवाई**
कोपरखैरणे –:
पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वाशी यांच्या मार्गदर्शनाखाली, दिनांक 3 मे 2025 रोजी सायंकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत कोपरखैरणे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कोंबिंग व विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत पोलीस विभागाने प्रभावीपणे विविध कारवाया केल्या.
**अमली पदार्थविरोधी कारवाई**
कोंबिंग ऑपरेशन दरम्यान, अमली पदार्थ तस्करीच्या संदर्भात 4 ठिकाणी सरप्राईज चेकिंग करण्यात आली. यात एका आरोपीकडून 589 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
**बांगलादेशी नागरिकांची तपासणी**
पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील 15 संशयित बांगलादेशी नागरिकांची ओळख पटविण्यासाठी तपासणी करण्यात आली.
**हत्यार आणि हद्दपार कारवाई**
ऑपरेशन दरम्यान एका आरोपीकडून कोयता जप्त करण्यात आला असून, भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच, तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एका आरोपीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
**इतर महत्वाच्या कारवाया**
* महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत 2 कारवाया
* सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशनप्रकरणी 7 कारवाया
* अमली पदार्थाचे सेवन – 5 कारवाया
* अश्लील वर्तनप्रकरणी – 1 कारवाई (कलम 294)
* ज्वालाग्रही पदार्थाबाबत निष्काळजीपणाची – 1 कारवाई (कलम 285)
* रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या – 8 कारवाया (कलम 283)
* COTPA अंतर्गत – 20 कारवाया
**नाकाबंदी व वाहतूक तपासणी**
नाकाबंदी दरम्यान 95 वाहने तपासण्यात आली असून, 41 वाहनांवर मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये 1 ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाचा समावेश आहे.
**गुन्हेगार तपासणी आणि समन्स बजावणी**
* 5 NBW, 1 BW आणि 28 समन्स बजावण्यात आले
* 11 हिस्ट्रीशीटर पैकी 4 मिळून आले
* 4 गुंडा आरोपी व 5 रेकॉर्डवरील आरोपी तपासण्यात आले; त्यापैकी 2 मिळून आले आणि त्यांना सूचना देण्यात आल्या
**हॉटेल, लॉज आणि बार तपासणी**
ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत 17 लॉज आणि 5 बार तपासण्यात आले.
ही संपूर्ण मोहिम 20 अधिकारी आणि 80 पोलीस अंमलदारांच्या उपस्थितीत पार पडली.
**- औदुंबर पाटील**
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कोपरखैरणे पोलीस ठाणे

