नवी मुंबई (प्रतिनिधी) *महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ *प्रदेशाध्यक्ष वसंजी मुंढे व राज्य संघटक संजयजी भोकरे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनखाली नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबईची जिल्हा कार्यकारणी जाहीर झाली. नवी मुंबईची अध्यक्षपदाची धुरा हाती आल्यापासून दशरथ चव्हाण यांनी अनेक सामाजिक उपक्रम व सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये केले असून पत्रकारांना भाडसवणारे अनेक प्रश्न मार्गी लागण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व येणाऱ्या काळातही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून नवी मुंबईतील अनेक पत्रकारांच्या समस्या वरती आवाज उठवणार असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं त्यामध्ये सिडको मार्फत पत्रकारांना मिळणाऱ्या घरांचा पाठपुरावा करणे पत्रकार भवन, पत्रकार विमा, पत्रकारांवरती होणारे खोटे गुन्हे व वंचित पत्रकारांसाठी येणाऱ्या अडचणी या सर्व समस्यांवरती जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमध्ये लवकरच आयोजन करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार संघटनेमध्ये सदस्य असलेल्या पत्रकारांची त्यांनी नव्याने नियुक्ती करून नवी मुंबई पत्रकार संघटने मध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. नवनियुक्त पत्रकार संघटनेतील पदाधिकाऱ्यांना त्यांनी काल नियुक्ती पत्र देऊन त्यांना पत्रकारांच्या प्रश्नावरती व जनतेच्या निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांवरती व जनतेच्या हितासाठी शासन दरबारी आपण संघटनेमार्फत आवाज उठवला पाहिजे असे अपेक्षा व्यक्त करून सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

यावेळी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार सुनील गायकवाड, वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी बांडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे कोकण विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके तसेच नवीन पदनियुक्त केलेले पदाधिकारी *कुंडलिक कानगुडे यांची नवी मुंबईच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली* तर *उपाध्यक्षपदी संजय वाघमारे* *कार्याध्यक्षपदी अशोक काळे* *सचिवपदी दिलीप म्हात्रे* *खजिनदारपदी अस्ते आलम मिर* यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी पत्रकारांशी बोलताना *नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण* यांनी सांगितले की नवी मुंबईतील राहिलेल्या पदनियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येतील.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मुंबई ,नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण ,यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघाची ,यशस्वी घोडदौड सुरू असून कोणत्याही ,कलंकित आणि बोगस पत्रकाराला ,कोणत्याही परिस्थितीमध्ये पत्रकार संघटनेचा ,सभासद बनवता येणार नाही जे श्रमिक कष्टकरी पत्रकार आहेत कोणत्या तरी वर्तमानपत्रात प्रमाणिक कार्यरत आहेत ,अशा पत्रकारांना सोबत घेऊन संघटनेचे कामकाज केले जाईल ,आणि त्यांनाच संघटनेचे सदस्यत्वपद देण्यात येईल ,कार्यरत असलेल्या अशा पत्रकारांनी ,पत्रकार संघटनेशी संपर्क साधून संघटना वाढवण्यासाठी ,एकत्र येऊन पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढावे असे आव्हान देखील जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण यांनी नियुक्तीपत्र देताना व्यक्त केलेले आहे

