Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

तुळजापूर विश्रामगृह येथे म रा मराठी पत्रकार संघाची आढावा बैठक

तुळजापूर विश्रामगृह येथे मंत्रालयीन जनसंपर्क अधिकारी तथा मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी पत्रकार संघाची आढावा बैठक उत्साहात संपन्न.

तुळजापूर प्रतिनिधी दि 9/02/2023

तुळजापूर विश्रामगृह येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई आयोजीत आढावा बैठकीला राज्याचे मंत्रालय मुख्य संपर्क प्रमुख .नितीन जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी तुळजापूर.कळंब,उस्मानाबाद, लोहारा उमरगा तालुक्यातील राज्य संघाचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज जिल्ह्यातील संघाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भुम,परंडा,वाशी ची भूम येथील बैठक झाल्या नंतर,तुळजापूर,उमरगा,लोहारा, मुरुम,कळंब,उस्मानाबाद तालुका प्रतिनिधींची तुळजापूर येथील बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.
जिल्ह्याच्या संघाच्या एकूण कामकाज,उपक्रम,पत्रकारांच्या अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली.
संघाच्या सर्व स्तरावरील कार्यकारीणीच्या नव्याने मतदान घेऊन निवडण्याचा या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.पत्रकारांना शासकीय मानधन, जिल्हा ठिकाणी कमी दरात घरांची योजना राबवणे, टोलमाफी, आदी संदर्भात राज्य शासना कडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.तसेच पत्रकारांवर अन्याय होत असेल तर संघटना एकत्रित लढा देण्यास कटीबद्ध असेल. जिल्हा कार्यकारणी तालुका नविन निवडी संदर्भात
येत्या दोन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करुन संघटनेची नव्याने मजबुत बांधणी करण्यात येणार असून शहरी,भागासह,ग्रामीण भागातील दैनिक,डिजिटल मीडिया (युट्यूब चैनल,पोर्टल) प्रतिनिधी,साप्ताहिक,संपादक,प्रतिनिधी यांनी संघाच्या सदस्यत्वासाठी स्थानिक तालुका अध्यक्षांना संपर्क साधुन सदस्य नोंदणी करुन घ्यावी.यासाठी वार्षिक सदस्य नोंदणी शुल्क भरण्यासाठी संघाचा क्युआर कोड दिला जाणार आहे.असे यावेळी बोलतांना नितीन जाधव यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे मंत्रालय मुख्य प्रमुख .नितीन जाधव यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.बैठकीत जाधव यांनी सांगितले,संघाचे संस्थापक अध्यक्ष राज्य संघटक संजयजी भोकरे यांनी ग्रामीण व शहरी भागातील वंचित पत्रकारांना न्याय हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे पत्रकारांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी म्हणून संघटनेची निर्मिती केली असून सध्याच्या परिस्थितीला देशभर संघटनेचा विस्तार झालेला असून महाराष्ट्र राज्यातील तब्बल वीस हजार पत्रकार सभासदांची सर्वात प्रभावी व मोठी संघटना म्हणून आपली ओळख आहे. सदर आढावा बैठकीच्या निमित्ताने पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ.विश्वासरावजी आरोटे यांनी पत्रकारांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.
प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव,मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी,संघटक विजयकुमार कुलदीपके यांनी उत्कृष्ट कार्य करत असलेल्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या वेळी कळंब तालुका अध्यक्ष दीपक बारकुल,जिल्ह्याचे मंत्रालय प्रतिनिधी अहमद शेख,एस.के.गायकवाड, तुळजापूर तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे,किशोर धुमाळ,लोहारा तालुका अध्यक्ष अब्बास शेख,सुनील खेले,उस्मानाबाद तालुका अध्यक्ष अरुण देशमुख यांच्या सह जिल्हातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मध्यरात्री दिली अचानक भेट

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबई पोलिसांनी करोडोचा गुटखा सप्लाय करणाऱ्या आरोपींना केले जेर बंद!

jantechasavdhanmaharashtra

*कोपरखैरणे पोलिसांची साखळी चोरी प्रकरणात मोठी कामगिरी — ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment